TOD Marathi

टिओडी मराठी, नांदेड, दि. 21 ऑगस्ट 2021 – नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे. महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये आंदोलने झाली आहेत. त्यावेळी त्या जिल्ह्यातील पालकमंत्र्यांनी हजेरी लावून पाठिंबा दिला आहे.

नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत?, अशोक चव्हाण दिल्लीमध्ये सगळ्यांना भेटले आहेत. पण, मला भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता, असा घणाघात संभाजीराजेंनी केलाय. यावर आता अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय.

अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते येथे आले नाहीत. आमच्या आंदोलनामध्ये सगळे आले पण, अशोक चव्हाण का आले नाही?. आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असे म्हणत संभाजीराजे यांनी टीका केली होती.

अशोक चव्हाणम्हणाले, संभाजीराजेंबद्दल मला आदर आहे. आमचे आणि त्यांच्या घराण्याचे संबध हे पूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे मी त्यांच्या टीकेवर कोणतेच उत्तर देणार नाही.