TOD Marathi

टिओडी मराठी, नवी दिल्ली दि. 6 ऑगस्ट 2021 – क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांना दिला जाणारा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बदललं आहे. आता केंद्र सरकाकडून या पुरस्काराचं नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं केलं आहे. आता येथून पुढे हा पुरस्कार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार या नावाने ओळखला जाणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती दिलीय.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, खेलरत्न पुरस्काराचे नाव बदलून या पुरस्काराचे नाव मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार ठेवण्यात यावे, यासाठी मला संपूर्ण भातातील नागरीकांकडून अनेक विनंत्या आल्या. त्यांच्या भावनांचा आदर करून खेलरत्न पुरस्काराला आता मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार संबोधण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, नुकतेच भारतीय पुरुष हॉकी संघाने टोकियो ऑलिंपिक २०२० मध्ये कांस्य पदक जिंकत अनोखा इतिहास रचला आहे. तसेच महिला संघानेही उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्याची किमया साधली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय हॉकी क्षेत्रासाठी अभिमानाची बाब असणार आहे.

शुक्रवारी (दि. ०६ ऑगस्ट) आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्वीट करत पंतप्रधान मोदी यांनी पुरस्काराचे नवे नाव घोषित केलं आहे. सोबत त्यांनी या पुरस्काराने नाव बदलण्यामागील कारण देखील सांगितले आहे.

दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार व अर्जुन पुरस्कार देऊन सन्मानित केलं जातं. या दिवशी हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचा वाढदिवस असतो, त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणूनही ओळखला जात होता.

क्रिकेट क्षेत्राबद्दल सांगायचे म्हंटलं तर, आतापर्यंत रोहित शर्मा (२०२०), सचिन तेंडुलकर (१९९७-९८), एमएस धोनी (२००७) आणि विराट कोहली (२०१८) यांना खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे. तसेच बीसीसीआयने यंदाच्या खेलरत्न पुरस्कारासाठी भारतीय संघाचा फिरकीपटू आर अश्विन आणि महिला संघाची कर्णधार मिताली राज हिची शिफारस केलीय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज