TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 4 ऑगस्ट 2021 – अतिवृष्टीमुळे कोकण भागात अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात अनेकांना आपले सर्व काही गमवावे लागले. तर हजारो कुटुंब बेघर झाली. अशा बाधीत कुटुंबियांना मदत करण्याचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यांच्या आदेश आणि सूचनेनुसार राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून बाराशे किलोमीटरवरून शुक्रवारी वर्गणीतून मदतीचा ट्रक जीवनावश्यक साहित्य घेऊन कोकणाकडे रवाना झाला. हि मदत पूरग्रस्तांना पोहचली आहे, असे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितले आहे.

यंदा मुसळधार पावसाने कोकण भागाला धुऊन काढले. या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्ते खचले, दरडी कोसळल्या, अशा घटना घडल्या. यामुळे कोकणातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. यातील अनेक कुटुंबे रस्त्यावर आली. अन्न, कपडे, रोख रकमा पुरात वाहून गेले. तर अनेकांचा दरडी कोसळून मृत्यू झाला.

याची दखल घेऊन कोकणातील नागरिकांना मदत करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना धावून आली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आदेश आणि सूचनेनुसार राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांच्या पुढाकारातून मदत केली जात आहे.

यामध्ये 1 हजार ब्लँकेट, 1 हजार साड्या, 3 हजार बिस्कीट पुडे, 3 हजार पाणी बॉटल, 5 टन तांदूळ, दीड टन डाळ, एक हजार टॉवेल, झटपट तयार होणाऱ्या नाष्टा नाष्ट्यासाठी आवश्यक साहित्य आदींचा समावेश आहे.

शुक्रवारी सकाळी 10 वाजता वणीतील शिवाजी चौकातून साहित्याने भरलेला हा ट्रक कोकणाकडे रवाना झाला आहे, असे मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी सांगितलं आहे.

मनसेचे मदतीचे आवाहन –
मनसेकडून मदतीची पहिली खेप शुक्रवारी रवाना होणार आहे. वणीतील ज्या नागरिकांना स्वेच्छेने मदत द्यायची असेल, त्यांनी केवळ वस्तू स्वरूपात आपली मदत मनसेच्या रूग्णसेवा केंद्रामध्ये द्यावी, रोख रक्कम स्वीकारल्या जाणार नाही, असे आवाहन मनसेच्या वतीने केले आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज