TOD Marathi

टिओडी मराठी, मुंबई, दि. 4 ऑगस्ट 2021 – महाराष्ट्र लोकसेंबा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परीक्षा 2020 ची तारीख जाहीर केली आहे. याबाबतचे प्रसिध्दीपत्रक प्रसिद्ध केलं आहे. आता हि परीक्षा शनिवारी, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी होणार आहे. आता परीक्षा कोरोना नियमांचे पालन करून घेतल्या जातील, असेही जाहीर केलं आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी / उमेदवार यांची चिंता दूर झाली आहे. आता स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थी / उमेदवार परीक्षेच्या तयारीला लागतील, असे समजत आहे.

याबाबत ‘टिओडी’ने स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी यांच्या वतीने आवाज उठवला होता. याबाबतचे वृत्त ‘टिओडी’ने टिओडी मराठी. कॉम या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलं होतं. याची दखल प्रशासनाने घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

महाराष्ट्र लोकसेंबा आयोगाने प्रसिध्दीपत्रकात असे म्हंटले आहे कि, महाराष्ट्र लोकसेंबा आयोगामार्फत रविवारी (दिनांक ११ एप्रिल, २०२१ रोजी) नियोजित विषयांकित महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्‍त पूर्व परोक्षा २०२० च्या आयोजनासंदर्भात शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक ९ एप्रिल, २०२१ रोजीच्या पत्रान्वये प्राप्त सूचनानुसार परीक्षा आयोगाच्या संर्दार्भिय प्रसिध्दीपत्रकाद्वारे पुढे ढकलली होती.

आता यासंदर्भात शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन, महसूल आणि वन विभाग यांच्या दिनांक 3 ऑगस्ट, 2021 रोजीच्या पत्रान्वये प्राप्त अभिप्रायानुसार हि परीक्षा शनिवार, दिनांक 4 सप्टेंबर, 2021 रोजी आयोजित केली जाणार आहे.

तसेच कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावच्या स्थितोच्या संदर्भात शासनाकडून वेळोवेळी राबविण्यात येणा-या उपाययोजना लक्षात घेतल्या जाणार आहेत. तसेच परीक्षेच्या आयोजनाच्या अनुषंगाने आयोगाकडून वेळोवेळी आढावा घेतला जाणार आहे.

याबाबतचो माहिती आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याकरोता आयोगाच्या संकेतस्थळाचे निर्यामत अवलोकन करणे उमेदवारांच्या हिताचे राहणार आहे, असेही महाराष्ट्र लोकसेया आयोगाने म्हंटले आहे.