टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 30 जुलै 2021 – करोनाच्या तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता लक्षात घेऊन नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी 31 ऑगस्टपर्यंत कायम ठेवली आहे. वास्तविक, याअगोदर आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी 31 जुलैपर्यंत केली होती, त्याची एक महिन्यासाठी म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत मुदत वाढविली आहे.
डीजीसीएकडून जारी केलेल्या परिपत्रकात नमूद केलं आहे की, काही निवडक मार्गांवर आंतरराष्ट्रीय उड्डाणे होतील. याव्यतिरिक्त हा निर्णय आंतरराष्ट्रीय मालवाहू उड्डाणांवर लागू असणार नाही.
गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनामुळे आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी उड्डाणांवर बंदी लागू केली होती. त्यानंतर मुक्कामाचा कालावधी वेळोवेळी वाढवला आहे. त्याचवेळी, मागील वर्षी मे महिन्यात देशांतर्गत विमान कंपन्या अटींसह पुनर्संचयित केल्या होत्या.
परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारने मागील वर्षी ‘वंदे भारत’ मिशन राबविले होतं. याअंतर्गत अनेक देशांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षित मायदेशी आणले होते.
याशिवाय, सरकारने काही देशांसोबत ‘एअर बबल’ करार केला. या कराराअंतर्गत विशेष आंतरराष्ट्रीय उड्डाणे मंजूर झालीय. मात्र, करोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक देशांनी भारतातून उड्डाणांवर बंदी घातलीय.