TOD Marathi

…म्हणून ‘त्या’ शेतकऱ्याने Sunny Leone चं बोल्ड पोस्टर लावलं शेतात ; ‘या’ प्रश्नावर मांडली रोखठोक भूमिका

टिओडी मराठी, दि. 30 जुलै 2021 – शेताच्या बांधावर कधी कृषी अधिकारी, अधिकारी फिरकतात का? शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतात का? असा प्रश्न करत माझ्या शेतातील पिकाला कोणी नजर लावू नये, म्हणून एका शेतकऱ्याने शेतात बुजगावण्यासारखा बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीचं बोल्ड पोस्टर लावलं आहे. आणि याबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. त्यामुळे याचा त्या शेतकऱ्याला फायदा झाला आहे. कारण, लोकांचं लक्ष शेतातील पीक पाहण्याऐवजी सनी लिओनीचं बोल्ड पोस्टरकडे जातंय.. मात्र, सोशल मीडियावर सनी लिओनीचं बोल्ड पोस्टरचे फोटो व्हायरल होत आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनीची भारतातील लोकप्रियता सर्वांत अधिक आहे, हे भारतीयांनी सर्वाधिक वेळा गुगल सर्च केलेल्या विषयांमधून समजतं. गेल्या काही वर्षांत चित्रपटसृष्टीमध्ये आपला जम बसवणाऱ्या सनीला अधिक फॅन फॉलोइंग झाला आहे.

मात्र, सनीला भारतामध्ये अभिनेत्री म्हणून ओळख मिळाल्यानंतर २०१८ साली ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली. विशेष म्हणजे कोणत्याही धक्कादायक खुलासे किंवा वक्तव्यांसाठी ती चर्चेत नव्हती तर एका मजेदार कारणामुळे तिच्या नावाची प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा झाली होती. हे कारण होतं सनी लिओनीच एक पोस्टर.

आंध्र प्रदेशमधील नल्लोर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये सनी लिओनीचा दोन मोठ्या आकाराचे पोस्टर्स लावले होते, याची बातमी समोर आली आणि सगळीकडे या पोस्टर्सचे फोटो व्हायरल झाले.

या पोस्टरमध्ये सनी ही लाल रंगाच्या बिकीनीत आहे. तसेच या पोस्टरवर तेलगू भाषेत एक ओळ लिहिली आहे. या ओळीचं भाषांतर असे, “माझ्यासाठी रडू नका किंवा माझा मत्सर करु (जेलस वाटून घेऊ) नका.”

आता प्रश्न पडला असेल की, या शेतकऱ्याने सनी लिओनीचे असे पोस्टर आपल्या शेतात का लावले आहेत?. तर यामागेही एक वेगळं लॉजिक आहे. आपल्या शेतात पिकणाऱ्या शेतमालाला लोकांची नजर लागू नये, म्हणून त्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि शेतातील मालाऐवजी या पोस्टरकडे अगोदर नजर जावी म्हणून हे पोस्टर शेतात लावले आहे.

सनी लिओनीचे हे पोस्टर लावणाऱ्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचं नाव अक्कीनापल्ली चिनचू रेड्डी असं आहे. यंदा माझ्या १० एकर शेतात मला चांगलं उत्पन्न मिळालं आहे. मात्र, यामुळे गावातील तसेच या शेताच्या बाजूने ये- जा करणाऱ्यामध्ये माझ्या शेतातील शेतमालाची चर्चा रंगली आहे. त्यामुळे या लोकांची नजर लागू नये, म्हणून मी सनी लिओनीचे हे मोठं पोस्टर शेतात लावलं आहे.

अक्कीनापल्ली चिनचू रेड्डी म्हणाले, माझ्या या ट्रीकचा फायदा झाला असून आता माझ्या शेतातील शेतमालाकडे कोणी पाहत नाही. त्यांनी सनीच्या या पोस्टरचा वापर बुजगावण्यासारखा केला.

मात्र, बुजगावणी ही पक्षांना घाबरवून पळून लावण्यासाठी असत. इथे सनीचे पोस्टर हे लक्ष वेधून घेण्यासाठी लावलं आहे. म्हणजे शेतातील शेतमालावर लक्ष जाण्याअगोदर सर्वांचं लक्ष आधी या पोस्टरकडे जातंय.

पोलीस व कृषी अधिकाऱ्यांना हे पोस्टर आक्षेपार्ह वाटलं नाही का? यासंदर्भात बोलताना अक्कीनापल्ली म्हणाले, आपण कोणत्याची कायद्याचं उल्लंघन केलं नाही.

आम्हाला शेतीत काय अडचणी येतात? हे जाणून घेण्यासाठी कधी अधिकारी आमच्या शेताच्या बांधावर आलेले नाहीत. त्यामुळे त्यांना या पोस्टरबद्दल काही आक्षेप असायचं काही कारण नाही.