टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 जुलै 2021 – परदेशातून भारतात आलिशान वाहनांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा देशामध्ये पहिल्यांदाच पर्दाफाश केला आहे. महसूल गुप्तचर संचालनालय मार्फत ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांत परदेशातून सुमारे 20 आलिशान वाहनांची भारतात तस्करी झाली आहे, अशी माहिती समोर आली आहे. याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने तीन आरोपींना अटक केली आहे. यातून त्यांनी सुमारे 25 कोटी रुपयांचा कर बुडवला आहे.
याप्रकरणी महसूल गुप्तचर संचालनालयाने तिघांना ताब्यात घेतलं आहे. यात गुरुग्राम स्थित आलिशान कारची डिलरशीप करणाऱ्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा ही समावेश आहे.
संबंधित आरोपी आपलं राजकीय वजन वापरून आलिशान वाहनांची भारतात तस्करी करत होते. गेल्या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये आरोपींनी सुमारे 20 महागड्या आलिशान वाहनांची भारतात छुप्या पद्धतीने तस्करी केलीय.
आरोपींनी संबंधित 20 महागड्या आलिशान वाहनांची भारतात तस्करी करत सुमारे 25 कोटी रुपयांचा कर बुडवला आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाकडून संबंधित आरोपींची चौकशी केली जातेय. याचा पुढील तपास सुरू आहे.