भारतात 38109 नवे रुग्ण, 43869 रुग्ण झाले बरे, तर 560 रुग्णांचा मृत्यू!

टिओडी मराठी, दि. 17 जुलै 2021 – दोन दिवसांपूर्वी देशामध्ये कोरोनाच्या प्रकरणांत वाढ झाल्यानंतर आता त्यात पुन्हा घट दिसून येतेय. मागील 24 तासांत 38,109 नवीन संसर्गग्रस्त आढळले आलेत. 43,869 रूग्ण बरे झाले आहेत. तर 560 लोकांचा मृत्यू झाला आहे.

सलग 9 व्या दिवशी 45 हजारांपेक्षा कोरोना रुग्ण आढळले आहेत. याअगोदर 7 जुलै रोजी 45,701 प्रकरणे समोर आली होती.

शुक्रवारी सक्रिय रुग्णांची म्हणजेच उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 6,329 ने कमी झाली होती. आता देशात 4.18 लाख रुग्णांवर उपचार केले जात आहेत. केरळ राज्यात सर्वाधिक 1.21 लाख सक्रिय प्रकरणे आहेत. 1.01 सक्रिय प्रकरणांसह महाराष्ट्र राज्य दुसर्‍या क्रमांकावर आहे.

देशात कोरोनाचे आकडे :
गेल्या 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 38,109
गेल्या 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 43,869
गेल्या 24 तासात एकूण मृत्यू : 560

आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.10 कोटी
आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.02 कोटी
आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.13 लाख
सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.18 लाख

Please follow and like us: