TOD Marathi

टिओडी मराठी, नागपूर, दि. 14 जुलै 2021 – महागाईमुळे देशातील जनता त्रस्त झाली आहे. सध्याचे केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रिमोटवर चालते. त्यामुळे आता संघानेच महागाई कमी करण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि केंद्राला सूचना करावी. यासाठीच आपण नागपुरामध्ये येऊन ही मागणी करत आहे. माझा आवाज संघाच्या कानापर्यंत पोहचेल, अशी अपेक्षा आहे, असा टोला देखील छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हाणला बुधवारी नागपुरामध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अ.भा. काँग्रेस समितीतर्फे महागाईविरोधात देशात जनजागरण केले जात आहे. याअंतर्गत भूपेश बघेल यांनी नागपुरात येत केंद्र सरकारवर निशाणा साधला. यावेळी बघेल म्हणाले, नरेंद्र मोदी सरकारने मागील सात वर्षे हिंदू- मुस्लीम, मंदिर- मशीद, अशा भावनिक मुद्यांवर घालवले आहे.

जनहिताच्या प्रश्नांकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे महागाईने उच्चांक गाठलाय. रिझर्व्ह बँकेने महागाईचा दर २ ते ६ टक्क्यांपर्यंत असेल, अशी शक्यता वर्तवली होती. मात्र, त्या पलिकडे महागाई गेली असून पेट्रोल २६ टक्क्यांनी तर डिझेल ४२ टक्क्यांनी वाढले आहे.

‘बहुत हुई महंगाई की मार’, असा नारा देत नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले. पण, आता महागाई एवढी वाढली आहे की ‘गद्दी छोडो मोदी सरकार’ असे जनता म्हणत आहे.

तत्पूर्वी विमानतळावर काँग्रेसचे शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश सचिव अतुल कोटेचा, प्रवक्ते अतुल लोंढे, विशाल मुत्तेमवार आदींनी विमानतळावर बघेल यांचे स्वागत केले.

केंद्रात काँग्रेसची सत्ता आली, तर पेट्रोल- डिझेल जीएसटीच्या कक्षेत आणण्याचा निश्चितपणे विचार करेल, असे भूपेश बघेल यांनी आश्वस्त केले. नरेंद्र मोदी सरकारने इतर उत्पादनांवर चुकीच्या पद्धतीने जीसीएसटी आकारल्याचा आरोपही त्यांनी केलाय.

तिसरे अपत्य असणाऱ्या कुठल्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, हा योगी आदित्यनाथ सरकारने घेतलेला निर्णय उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेवून घेतला आहे.

ज्यांना दोन अपत्य आहे, त्या सर्वांना योगी सरकार नोकरी देणार आहे का? असा सवाल करीत या कायद्याची छत्तीसगडमध्ये गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

यावेळी बघेल म्हणाले, भाजपची सत्ता नसलेल्या राज्यात ईडी, सीबीआय आणि आयटी या विभागांमार्फत धाडी घातल्या जात आहेत. या तीनही एजंसी भाजपच्या शाखा म्हणून काम करत आहेत.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज