TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 10 जुलै 2021 – अनेक देशांनी कोरोना रुग्णसंख्या कमी होत आहेत म्हणून निर्बंध, नियम शिथिल केलेत. त्यामुळे कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे. त्यासाठी अनेक देशांनी करोना लसीकरणावर जोर दिलाय. त्यामुळे आता कोरोना संपला आहे, अशा भ्रमात राहू नका, असा सल्ला वजा इशारा जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामिनाथन यांनी दिला आहे.

चीनमधून अवघ्या काही महिन्यात कोरोना विषाणूने जगात हातपाय पसरले. त्यामुळे कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी प्रत्येक देश प्रयत्न करत आहे. त्यासाठी अनेक देशांनी करोना लसीकरणावर जोर दिलाय.

सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गचा वेगही कमी झालेला नाही, त्यामुळे यापुढे काळजी घेणं आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. मागील काही दिवसात करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत आहे.

मागच्या दोन आठवड्यामध्ये आफ्रिकेतील मृत्यूदर ३०-४० टक्क्यांनी वाढलाय. मागील २४ तासात ५ लाख नवीन करोना रुग्ण आढळून आलेत. तर ९,३०० जणांचा करोनामुळे मृत्यू झालाय. ही काय करोना कमी होण्याची लक्षणं नाहीत, असंही सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे.

डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक घातक कोरोना विषाणू आहे. या विषाणूची लागण झालेला व्यक्ती ८ जणांना संक्रमित करतो. तेच प्रमाण करोनाच्या इतर विषाणूमध्ये ३ इतकं आहे. त्यामुळे डेल्टा विषाणू किती घातक आहे? याचा अंदाज येत आहे, असंही त्यांनी सांगितलं आहे.

कोरोनामुळे मागील काही दिवसांपासून घरात असणाऱ्या लोकांना मानसिक थकवा जाणवतोय. त्यामुळे ते सक्तीने बाहेर पडत समाजामध्ये मिसळत आहेत. मात्र, संपर्क वाढल्याने करोनाचा प्रसार होत आहे. त्यात अनेक देशांनी करोनावरील निर्बंध शिथिल केलेत.

तसेच सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं बंधनकारण नाही, असं सांगितलं आहे. त्यासह लसीकरणाचा वेग मंदावलाय. अनेक देशात लसींचा तुटवडा जाणवतोय. तसेच आरोग्य सुविधांचा अभाव असल्याने मृत्यूदर वाढलाय.

कोव्हॅक्सिन करोनावर प्रभावशाली आहे, असं देखील सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे. या लसीचा प्रभाव उत्तम आहे. कोव्हॅक्सिनच्या ३ टप्प्यातील अहवालाचा अभ्यास सुरुय. ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोव्हॅक्सिनला जागतिक परवानगी मिळेल, असंही सौम्या स्वामिनाथन यांनी सांगितलं आहे.

हि आहेत कोरोना पसरण्याची प्रमुख कारणे :

  1. कोरोनाचा नवा डेल्टा व्हेरिएंट विषाणू वेगाने पसरत आहे. एका व्यक्तीपासून
  2. दुसऱ्या व्यक्तील संक्रमित करण्याचा वेग जास्त आहे.
  3. लॉकडाऊन, नियम शिथिल केल्याने करोना रुग्णसंख्येत वाढ झालीय.
  4. बाजार, कार्यक्रमात लोकांची गर्दी वाढल्याने करोनाचा प्रसार होत आहे.
  5. करोना लसीकरणाचा वेग मंदावल्याने रुग्णसंख्या देखील वाढत आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज