टिओडी मराठी, दि. 5 जुलै 2021 – विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले की, आज जेव्हा उत्तर प्रदेश, गुजरात अशा पाच राज्यांत निवडणुकांचे वारे वाहत आहेत त्यावेळी भागवतांनी हिंदु- मुसलमान एक आहेत, असे बोलणे म्हणजे आरएसएस सरड्यासारखे रंग बदलत आहे, हे दिसून येतंय, अशी जहरी टीका नितीन राऊत यांनी केलीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू- मुस्लीम ऐक्यतेच्या व्यक्तव्यांवरून आज राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी टीका केली आहे.
मोहन भागवातांनी हिंदु- मुसलमानांमध्ये मतभेद नाहीत. असे विधान केले परंतु त्यांनी या गोष्टीचे उत्तर द्यावे की, ज्या मुसलमानांना गोस्टच्या नावाखाली मारले. ज्या मुसलमानांचा जीव झुंडशाहीने घेतला, त्यावर ते काहीच का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत राऊत यांनी भागवतांचा समाचार घेतला.
भारतात मुस्लीम व्यक्ती राहू शकत नाही, असे एखादा हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही, असे स्पष्ट मत प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलंय.
तसेच हिंदू-मुस्लीम ऐक्य’ हे दिशाभूल करणारे आहे. कारण हिंदू-मुस्लीम मूलत: एकच आहेत, असे विधान भागवतांनी केले होते. या विधानवरून नितीन राऊत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केलीय.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात ठराव आणणार आहे. मागील अनेक दिवसांपासून कृषी कायद्याच्याविरोधात देशातील सर्व शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलक शेतकऱ्यांची मागणी आहे की, कृषी कायदा रद्द झाला पाहिजे.
या शेतकऱ्यांचे समर्थन करण्यासाठी नियोजन केले आहे. त्यांसबंधाचा ठराव मांडला जाणार आहे. तसेच केंद्राचे कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत, अशी भूमिका नितीन राऊत यांनी मांडली.