टिओडी मराठी, मुंबई, दि. 16 जून 2021 – राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमीन व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याच्या आरोपावरून शिवसेनेने टीका केली होती. याचा निषेध नोंदवण्यासाठी भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते मुंबईतील दादर इथल्या शिवसेना भवनाबाहेर जमले आणि त्यांनी भाजप युवा मोर्चातर्फे आंदोलन केलं. याबाबतची माहिती मिळताच शिवसैनिकांनी येथे उपस्थिती लावली. यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत शाब्दिक चकमक झाली आणि ते एकमेकांना भिडले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांत झालेल्या हाणामारीमुळे येथील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.
परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर केला. पोलिसांनी यावेळी भाजप युवा मोर्चाच्या ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं आहे.
अयोध्येत जमीन खरेदीमध्ये मोठा भ्रष्टाचार असल्याचे आरोप आणि त्याबाबतची कागदपत्रे समोर आली आहेत. अशाप्रकारचा घोटाळा हिंदूंसाठी संतापजनक आहे.
या प्रकरणाबाबत संस्थेबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदनेही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना पक्षाने केली आहे.
Mumbai: Bharatiya Janata Yuva Morcha (BJYM) workers protested outside Shiv Sena Bhavan, in Dadar, today over allegations of land scam regarding Ayodhya Ram Temple construction. A scuffle broke out b/w Shiv Sena & BJYM workers during protest.
At least 40 BJYM workers detained. pic.twitter.com/2vju6sUaL6
— ANI (@ANI) June 16, 2021
‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी लखनौमध्ये पत्रकार परिषद घेऊन राम मंदिर ट्रस्टवर जमीन खरेदीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप केला.
2 कोटींची जमीन अवघ्या ५ मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) मार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी सिंह यांनी केली.
मागील 100 वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झालेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही.
या नव्या आरोपांत किती तथ्य आहे? याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,” अशी भूमिका मांडत ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी आरोप फेटाळले.