टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 16 जून 2021 – लसींचा तुटवडा जाणवत असताना सरकारने महिन्याभरापूर्वी कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर वाढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा निर्णय तज्ज्ञांना अंधारात ठेऊन घेतला होता का?, असा प्रश्न निर्माण झालाय. … म्हणून कोरोनाचा पसरला. त्यावरुन, काँग्रेस नेते राहुल गांधींनी केंद्राच्या मोदी सरकारवर टीका केलीय.
भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याने लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. पण, लसींची टंचाई जाणवत असल्याने लसीकरणाला गती देण्यात अडथळे येताहेत.
तज्ज्ञांच्या सल्लाने कोविशील्डच्या दोन डोसमधील कालावधी वाढवत असल्याचे सरकारने सांगितलं होतं. मात्र, अशा प्रकारचा कोणताही सल्ला आपण केंद्राला दिला नसल्याचे पॅनलमधील तीन तज्ज्ञांनी एका या वृत्तसंस्थेला सांगितलंय.
कोविशील्डच्या २ डोसमधील अंतर ६ ते ८ आठवड्यांवरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने १३ मे रोजी घेतलाय. त्यावेळी देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत होती. लसींचा साठा कमी होता. त्यावरुन, राहुल गांधींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
देशामध्ये तात्काळ लसीकरण पूर्ण करायला हवं. नरेंद्र मोदी सरकारच्या निष्क्रीयतेमुळे झालेली लसींची कमतरता लपविण्यासाठी भाजपकडून दररोजचा खोटेपणा आणि नारेबाजी कामाची नाही, असे राहुल गांधींनी म्हटलं आहे.
तसेच, पंतप्रधानांची खोटी प्रतिमा सावरण्यासाठी केंद्र सरकारचे सुरू असलेले प्रयत्न कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवत आहेत. त्यामुळे, लोकांचा जीव जातोय, असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय.
देश को तुरंत व पूर्ण टीकाकरण चाहिए- मोदी सरकार की निष्क्रियता से हुई वैक्सीन की कमी को छुपाने के लिए भाजपा के रोज़ के झूठ और खोखले नारे नहीं!
PM की झूठी छवि बचाने के लिए केंद्र सरकार की लगातार कोशिशें वायरस को बढ़ावा दे रही हैं और जनता की जान ले रही हैं। pic.twitter.com/zE0XbNgVca
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 16, 2021