टिओडी मराठी, दि. 10 जून 2021 – शेअर बाजार गुरुवारी दिवसातील वरच्या स्तरावर बंद झाला. BSE Sensex 358.83 अंकांच्या वाढीसह 52,300.47 वर बंद झाला आहे. त्यासह NSE वरील Nifty 99.25 अंकांच्या वाढीसह 15,734.60 वर बंद झाला आहे. Nifty च्या 50 पैकी 37 शेअर्स तेजीमध्ये होते तर, 30 शेअर्स पैकी 23 शेअर्समध्ये वाढ झालीय.
BSE वर आज Bajaj finance चे शेअर्स 7.69 टक्क्यांवर गेले होते. यानंतर बजाज फिनसर्व्हरचे शेअर्स 3.87 टक्के झालेत. त्यानंतर एसबीआय, इंडसइंड बँक, डॉ. रेड्डी, टेक महिंद्रा, आयटीसी, कोटक बँक, अॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, इन्फोसिस, एचडीएफसी, टीसीएस, रिलायन्स, सन फार्मा, टायटन, एम अँड एम, एलटी या कंपन्यांचा फायदा झालाय.
तर बजाज ऑटो, मारुती, एचसीएल टेक, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, ओएनजीसी आणि नेस्ले इंडियाच्या शेअर्समध्ये घट झालीय.
बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, DIVIS LAB, SBI आणि इंडसइंड बँकेचे समभाग आज NSE मध्ये TOP गेनर्स ठरलेत. त्यासह बाजाज-ऑटो, ईचर मोटर, यूपीएल, श्री सिमेंट आणि अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये घसरण झालीय.
साप्ताहिक समाप्तीच्या दिवशी BSE वर 3,333 कंपन्यांच्या शेअर्समध्ये ट्रेडिंग झाले आहे. यामध्ये 2,460 कंपन्यांचे शेअर्स झपाट्याने बंद झालेत. त्यासह 724 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झालीय. आजची एकूण मार्केट कॅप 2 कोटी 30 लाख रुपये इतकी आहे.
(टीप : ‘टिओडी मराठी’च्या वाचकांसाठी हे संकलित वृत्त आहे. आर्थिक बाबींची जबाबदारी ‘टिओडी मराठी’ घेत नाही.)