टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 8 जून 2021 – महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नुकतीच बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन चर्चेविषयी माहिती दिली. पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र सदनामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि अशोक चव्हाणही उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत व्यवस्थित चर्चा झाली. त्यांनी सर्व विषय ऐकून घेतले. महाराष्ट्र राज्याचे जे विषय मांडले आहेत, त्याची माहिती घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिलंय.
पंतप्रधानांसमोर राज्यातील संवेदनशील विषय मांडले आहेत. तसेच मराठा आरक्षण, मागावसर्गीयाचे बढतीमधील आरक्षण, मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गमधील जागेची उपलब्धतता, जीएसटी परतावा, पीक विमाबद्दल नरेंद्र मोदींशी चर्चा झाली आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.
अशोक चव्हाण यांनी यावेळी नरेंद्र मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. मराठा आरक्षणातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातील महत्वाचे मुद्दे मोदींच्या निदर्शनास आणून दिलेत. ‘
आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा शिथील करावी. अन्यथा, राज्यांना अधिकार देऊनही आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागणार नाही,’ अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. तसा युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये झाला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
तुमच्याकडे अधिकार असताना निर्णय घ्यावा. मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी विनंती नरेंद्र मोदींना केली. मराठा असो किंवा ओबीसी आरक्षण असो घटनादुरुस्ती किंवा कायदेशीर मार्ग असतील सकारात्मक भूमिका घ्यावी, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
12 जागा आठ महिन्यापासून रिक्त :
यावेळी मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींसमोर विधानपरिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांचा मुद्दा देखील मांडला. ‘सरकार बहुमतामध्ये आहे. कॅबिनेटने ठरावा केला व राज्यपालांना भेटलो. या १२ जागा आठ महिन्यापासून रिक्त आहेत.
नियमावलीत ज्याप्रमाणे व्यक्ती निवडताना अटी असतात, त्या सर्वांचा त्यात समावेश आहे. तर तो मुद्दाही आम्हीही नरेंद्र मोदींकडे मांडला. यावर त्यांनी जे काही करण्याची गरज आहे, त्यासंबंधी निर्णय घेतो, असे सांगितले आहे,’ अशी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.