टिओडी मराठी, मुंबई, दि. 24 मे 2021 – सोशल मीडियावर अधिकृत अकाउंट सुरु करून अनेकांच्या संपर्कात राहण्यासाठी अनेक युजर्स प्रयत्न करीत असतात. तसेच ट्विटरवर ब्लू टिक मिळविण्यासाठी धडपडत असतात. पण, यासाठीची संपूर्ण माहिती नसल्यामुळे क्लोनिंग अकाउंट तयार होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे अशा प्रकारचा धोका टाळण्यासाठी ट्विटरने ब्लू टिक देण्यासाठी कॅटेगरीमध्ये फिट बसावे लागेल, असे नियम केले आहेत. याविषयी आपण जाणून घेऊया.
ट्विटर वेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू करत आहे. यानंतर आपल्या ट्विटर अकाउंटवर यूजर्सना ब्लू टिक मिळू शकणार आहे. पण, यूजरला यासाठी ट्विटरने केलेल्या कॅटेगरीमध्ये फिट बसावे लागणार आहे. या कॅटेगरीत युजर्स बसत असल्यास, त्यांना ब्लू टिक मिळेल. कोणीही ब्लू टिकसाठी अर्ज करू शकतो. पण, यासाठी अर्ज कसा करावा, याविषयी पाहू.
ट्विटरची ब्लू टिक मिळवण्यासाठी Authentic, Notable व Active यूजरचे अकाऊंट असणे अनिवार्य आहे. यात Authentic म्हणजे अकाऊंट फेक नसून खरे असणे गरजेचे आहे.
Notable म्हणजे ट्विटरने तयार केलेल्या सहा प्रकारांपैकी एकात फिट होणे गरजेचे आहे. या कॅटेगरी सरकार, कंपनी किंवा ब्रँड आणि ऑर्गनायजेशन, न्यूज ऑर्गनायजेशन किंवा जर्नलिस्ट, एंटरटेनमेंट, स्पोर्ट्स आणि गेमिंग, अॅक्टिविस्ट अशा आहेत.
तसेच अकाऊंट अॅक्टिव्ह म्हणजे गेल्या सहा महिन्यांपासून हे अकाऊंट आपण सतत वापरत असणे गरजेचं आहे. तसेच अकाऊंटवर आपली माहिती असते, म्हणजेच यूजरचे नाव व प्रोफाइल फोटो यासारखी माहिती असावी. त्यासह युजर्सचा अकाऊंटचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरही असावा.
याशिवाय नियमांचे उल्लंघन केल्यामुळे युजर्सवर ट्विटरद्वारे बंदी घातलेली नसावी. या सर्व अटींमध्ये युजर बसत असल्यास ब्लू टिकसाठी अर्ज करू शकता.
यूजरला ब्लू टिकसाठी अप्लाय करण्यासाठी अकाऊंट सेटिंगमध्ये जाऊन ‘Request Verification’ वर क्लिक करावे. पण, हे बटन अद्याप दिसत नाही, ते लवकरच दिसू लागेल. आपल्याला या बटनवर क्लिक करण्यासाठी संबंधित कॅटेगरी सिलेक्ट करावी.
तसेच आयडी कार्ड देऊन पुरावा द्यावा. या व्यतिरिक्त अधिकृत वेबसाइटची लिंकही द्यावी, जी आपल्या ट्विटर खात्याची पुष्टी देईल.
अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, काही दिवसांनंतर ट्विटरकडून एक मेल प्राप्त येईल. युजरचा अर्ज मंजूर झाल्यास आपोआप ब्लू टिक आपल्या अकाऊंटसमोर दिसू लागेल. ज्या कॅटेगरीत युजर बसत नसेल, तर काही काळानंतर ट्विटर आणखी कॅटेगरी अॅड होतील.