TOD Marathi

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ५ जूनला अयोध्या दौर्‍यावर जाणार होते मात्र आता हा दौरा स्थगित केल्याचे त्यांनी सांगितले. स्वतः राज ठाकरे यांनीच समाज माध्यमांवर याबाबतची माहिती दिली. या निर्णयावर आता राष्ट्रवादी काँग्रेसने राज ठाकरेंना डिवचले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्वीट करण्यात आले आहे. आपला अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला हे सांगण्यासाठी राज ठाकरे यांनी जे पोस्टर समाज माध्यमांवर शेअर केलं तेच पोस्टर राष्ट्रवादीने वापरलं आणि

“तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटविण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच…”

अशा आशयाचे ट्विट पक्षाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डल वरून केले आहे.

हे ट्विट आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्विटमध्ये राष्ट्रवादीने मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलला देखील मेंशन केलं त्यामुळे राष्ट्रवादीच्या या ट्वीटरवर आता मनसे कडून काय प्रतिक्रिया दिली जाणार याची उत्सुकता लागली असतानाच मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून राष्ट्रवादीच्या ‘त्या’ ट्विटला रिट्विट करत एक ट्विट करण्यात आले आहे.

“कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा फक्त जनहिताचा भोंगा!
महाविकास आघाडी विरोधातला भोंगा पुण्यात लावूच…
त्याचा आवाज मुजोर सत्ताधाऱ्यांना भानावर आणेल!
तोपर्यंत देशाच्या माजी कृषिमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या कांद्याला प्रति किलो ५ पैशाचा भावच कसा मिळत राहील, याबाबत तुम्ही विचारविनिमय करत बसा !!”

असं ट्विट करण्यात आलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या ट्वीटला उत्तर देण्यात आलेलं आहे. तर ट्विटरवर रंगलेल्या या वॉरची राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा होताना दिसतेय.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज