टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 10 मे 2021 – देशामध्ये नुकत्याच पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी म्हणावी तेवढी उत्तम झाली नाही. निवडणुकीमध्ये काँग्रेसला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. याच मुद्द्यावरून आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. यावेळी काँग्रेसचा पराभव कशामुळे झाला? याचे आत्मपरीक्षण केलं. तसेच काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी ह्या स्वतः पक्षाची स्थिती सुधारण्यासाठी मैदानात उतरल्या आहेत.
पाच राज्यांमधील नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेसच्या निकृष्ट कामगिरीनंतर पक्षाचे अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षात सुधारणा करण्याची गरज आहे, असे म्हटले आहे. तसेच निवडणुकीमध्ये पराभव का झाला? याची कारण मीमांसा हि करणार आहे.
या सर्व गोष्टी करण्यासाठी सोनिया गांधी यांनी एक समिती स्थापन करणार आहे. ही समिती पक्षात काय बदल करायचे आहेत? आणि पक्षाला बसलेले झटके यावर माहिती गोळा करणार आहे. समितीने तयार केलेल्या अहवालावर पक्षप्रमुख निर्णय घेणार आहे, असे हि असे त्यांनी म्हटले आहे.
देशातील कोरोनाच्या मुद्द्यावर देखील या बैठकीमध्ये चर्चा झाली. कोरोना नियंत्रित करण्यात मोदी सरकार अपयशी ठरत आहे, असा आरोप सोनिया गांधी यांनी यावेळी केला.
सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याच्या मागणीचा पुनरुच्चार त्यांनी केलाय. तसेच देशातील सध्याच्या परिस्थितीचा विचार करता सर्व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला जाण्याचे आवाहन हि केले आहे.