TOD Marathi

टिओडी मराठी,, दि. 10 मे 2021 – आता निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर वाढ केली जात आहे. अशा प्रकारे पेट्रोल डिझेलचे दर वाढवून नरेंद्र मोदी सरकार लोकांचे खिसे कापत आहे. हे सरकार पाकिटमार बनलंय, असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला हाणाला आहे.

नवाब मलिक म्हणाले, दिवसेंदिवस पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. काही जिल्हयामध्ये पेट्रोलचा दर शंभरावर गेला आहे. जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर असताना भारतात दर का वाढवले जात आहेत? हे नरेंद्र मोदींनी जनतेला सांगितले पाहिजे.

आता कोरोनाचे संकट असताना पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणे, कितपत योग्य आहे? याचे पडसाद महागाई वाढण्यावर होत आहेत. त्यामुळे लोकांची लूट थांबवावी आणि जगात पेट्रोल आणि डिझेलचे दर आहेत तेच भारतात असावेत, तसेच तेलाची लूट देखील थांबवावी, अशी मागणीही नवाब मलिक यांनी केंद्राकडे केली आहे.

“भाजपशासित उत्तर प्रदेश व बिहारमध्ये कोरोना मॅनेजमेंट जाहिरातीत आहे. जितके पैसे जाहिरातीवर खर्च करताय, तेवढे पैसे कोरोनावर खर्च केला असता तर प्रत्येक गावात लोकांचा मृत्यू झाला नसता,” अशी टीकाही नवाब मलिक यांनी केलीय.

कोरोना परिस्थिती लक्षात घेता ‘एक देश, एक निती’ हा कार्यक्रम ठरवण्याची आवश्यकता असताना नुसत्या जाहिरातीच्या माध्यमातून कोरोना संपणार नाही, असा हि टोला नवाब मलिक यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये शव दाहिन्यांमध्ये जात नाही, तर नदीमध्ये अंत्यसंस्कार केले जात आहेत, ही परिस्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण देशात एक धोरण तयार केलं नाही, तर कोरोना देशातून हद्दपार होणार नाही,” अशी भीती मलिक यांनी व्यक्त केली.

तसेच मोदी सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवावी व धोरणे ठरवावी, अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. “केंद्र सरकारला कोरोना परिस्थिती हाताळता येत नाही. याबाबत कुणाच्याही मनात शंका राहिलेली नाही.

देशातील सात उच्च न्यायालयांनीही वेगवेगळे आदेश दिलेत. सर्वोच्च न्यायालात टास्क फोर्स निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. जी कामे केंद्र सरकारला करायची आहेत ती केंद्र सरकारकडून होत नाहीत, म्हणून न्यायालयाच्या आदेशाने होत आहेत. याचा अर्थ सरकार जबाबदारी पार पाडण्यात कमी पडत आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज