TOD Marathi

टिओडी मराठी, दि. 10 मे 2021 – कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरण मोहीम सरकारने सुरु केली आहे. अगोदर 45 वयोगातील लोकांना लस देण्यात आली. आता 18 वर्षावरील सर्वाना कोविड 19 लस देण्याची मोहीम सुरुय. पण, नागरिकांना आता त्यांना कोवॅक्सिन लस घ्यायची की कोविशिल्ड घ्यायची? याची निवडही करता येणार आहे. 18 वर्षावरील लसीकरण सुरु झाल्यावर कोवीन पोर्टलवर (https://www.cowin.gov.in/home) नोंदणी करणे गरजेचं आहे.

मात्र, या प्रक्रियेत काही गडबडी झाल्याने या पोर्टलमध्ये आवश्यक ते बदल केले आहेत. त्यानुसार आता नवीन नोंदणी केल्यावर अपॉइंटमेंट बुक झाली की मोबाईलवर चार आकडी ओटीपी येत असून हा ओटीपी लसीकरण केंद्रावर दाखवावा. त्यामुळे नोंदणी केलेले तुम्ही आहात याची खात्री होईल.

ओटीपी शिवाय डॅश बोर्ड मध्येही बदल केला आहे. पोर्टल ओपन केल्यावर सहा पर्याय दिसतात. त्यात कोवॅक्सिन की कोविशिल्ड, मोफत कि पेड ? यातून निवड करता येणार आहे.

याअगोदर लस दिल्यावर आलेल्या मेसेज वरून तुम्हाला कुठली लस दिली ते समजत होते. लस निवडीचा अधिकार असावा, अशी मागणी अगोदरपासून केली जात होती.

‘कोवीन’ पोर्टलवर नोंदणी केली पण, लस न घेताच लस दिल्याचे मेसेज नागरिकांना मिळत होते. त्यामुळे गडबड झाली. ती त्रुटी पोर्टलमध्ये बदल करून काढून टाकली आहे, असे स्वास्थ आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.