TOD Marathi

मुंबई:
निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मला वाटतं राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवले गेले. केवळ माझा माणूस म्हणून बिनडोक व्यक्तीला पदावर बसवता कामा नये, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला. आम्ही राज्यपाल हटवण्यासाठी काही अवधी दिला आहे. त्या दरम्यान काही घडलं नाही तर आम्ही भूमिका घेणारच आहोत. महाराष्ट्र काय आहे हे दाखवून देणारच आहोत, असा इशाराच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिला आहे.

संत सेवालाल महाराज याचे पाचवे वंशज अनिल राठोड यांनी ठाकरे गटात प्रवेश केला (Anil Rathod, the fifth descendant of Saint Sewalal Maharaj, entered the Thackeray Gatta). यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. राज्यपाल हे राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असतात. सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयुक्तांच्या नेमकी विषयीची याचिका दाखल करण्यात आली आहे. मला वाटतं राज्यपालांची नियुक्तीही कोणत्या निकषावर व्हावी हे ठरवलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.
उगाच माझ्या आजूबाजूचे आहेत म्हणून कुणालाही राज्यपाल करू नये. राज्यपाल पदावर त्या दर्जाचीच लोकं पाहिजे. केवळ माझा माणूस आहे. मग तो बिनडोक असला तरी चालेल पण मी राज्यपाल म्हणून पाठवेल, असं नाही चालणार. महाराष्ट्र बंद करण्यात येणार आहे. त्याबाबत सर्व पक्षांशी आमची चर्चा सुरू आहे. जे जे महाराष्ट्र प्रेमी आहेत. त्यांनी या विरोधात आवाज उठवला पाहिजे. आम्ही लवकरच त्याबाबतचा निर्णय जाहीर करणार आहोत, असंही ते म्हणाले.
उदयनराजे (Udayanraje) यांना मी खास धन्यवाद देईल. या मुद्द्यावर भाजपमधील सुद्धा छत्रपती प्रेमी एकत्र यावेत. तशी सुरुवात झाली आहे. आम्ही अवधी दिला होता. चांगलं सांगून राज्यपाल जात नसतील तर महाराष्ट्र काय आहे दाखवण्याची वेळ आली आहे. घाईघाईने काही केलं असं होऊ नये म्हणून थांबलो होतो. नाही तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्र बंद व्हावा ही सर्वांची भूमिका आहे. लवकरच कार्यक्रम जाहीर करू. घाईघाईने काही केलं असं होऊ नये म्हणून थांबलो होतो. नाही तर आम्ही आमची भूमिका जाहीर करू. महाराष्ट्र बंद व्हावा ही सर्वांची भूमिका आहे. लवकरच कार्यक्रम जाहीर करू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.