TOD Marathi

पुणे:
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात  काही लोकांकडून सातत्याने वादग्रस्त विधान करून महापुरुषांचा अपमान करण्याची जणू स्पर्धाच लागलेली आहे. या राज्याचा भूगोल जसा वैविध्यपूर्ण आहे तसा इतिहासही समृध्द आणि प्रेरणादायी आहे. अनेक महान व्यक्तिमत्त्वांचे परिश्रम आणि असंख्य संत-महात्म्यांच्या विचारांच्या पायावर आज आपला महाराष्ट्र उभा आहे. म्हणून अन्य कोणत्याही राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र हा नेहमीच उजवा राहिला आहे. विशेषतः परराज्यातून येऊन विविध उच्च पदांवर बसलेल्यांकडून वारंवार अवमान होत असताना तो निमूटपणे पहात बसणं हे मनाला अत्यंत वेदना देणारं आहे.

चूक ही एक वेळ होऊ शकते परंतु वारंवार होत असेल तर ती चूक नसते तर जाणीवपूर्वक आणि पद्धतशीरपणे रचलेलं एक षडयंत्र असतं. काही छुपे अजेंडे सेट करण्यासाठी तर हे षडयंत्र रचलं जात नाही ना, अशी शंका सामान्य लोकांच्या मनामध्ये येत आहे. छत्रपती शिवरायांनी अठरापगड जाती-धर्माच्या माळव्यांना सोबत घेऊन स्वराज्याची उभारणी केली. पण अलिकडे कोणीही उठतो आणि महाराजांचा आणि इतर थोर पुरुषांचा अवमान करतो, हे अत्यंत संतापजनक आणि चीड आणणारं आहे असं म्हणत महाराष्ट्रद्वेषी प्रवृत्तीचा तीव्र विरोध आणि धिक्कार करण्यासाठी महाराष्ट्राचा स्वाभीमानी नागरीक म्हणून आत्मक्लेश करण्याचा निर्णय घेत असल्याचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे.(MLA Rohit Pawar said that he is deciding to commit self- immolation as a self – respecting  citizen of Maharastra)

स्वराज्यरक्षणासाठी बलाढ्य शक्तीविरोधात लढताना न झुकता बलिदान दिलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या (Dharmaveer Chhatrapati Sambhaji Maharaj) वढू (पुणे) (Pune) येथील समाधीस्थळी शनिवारी आपण आत्मक्लेष करणार आहोत असं आमदार रोहित पवार (Rohit Pawar will do self Conflict)  यांनी सांगितलं होतं त्यानुसार रोहित पवार त्या ठिकाणी पोहोचले आहेत.