भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे दोन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर आहेत. (Chandrashekhar Bawankule on Kokan tour) दरम्यान, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी (Ratnagiri) या दोन जिल्ह्यामध्ये ते दौरा करणार आहेत. मागील तीन महिन्यात हा त्यांचा दुसरा दौरा आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मात्र त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. भाजपची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळेंसाठी हा दौरा महत्वाचा असणार आहे. २५ नोव्हेंबरला ते रत्नागिरीत आणि २६ नोव्हेंबरला सिंधुदुर्ग दौऱ्यावर असणार आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या दौऱ्याला महत्व प्राप्त झालेलं आहे. कोकणमध्ये भाजपची परिस्थिती तशी मजबूत नाहीये. कणकवली येथे नितेश राणे एकमेव भाजपचे आमदार आहे. त्यामुळे कोकण परिसरात इतर ठिकाणी देखील आपल्या पक्षाचे वर्चस्व वाढविण्यासाठी गेले आहे. राज्यातला १६ लोकसभा मतदारसंघांवर भाजपाने लक्ष केंद्रीत केलेलं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला ओळखला जाणाऱ्या म्हणजेच रत्नागिरी व सिंधुदुर्ग मतदारसंघाचा देखील यात समाविष्ट आहे. इकडे शिवसेनेचे विनायक राउत म्हणून खासदार आहे. याआधी देखील भाजपचे काही नेते, केंद्रीय मंत्री अजयकुमार मिश्रा, आशिष शेलार, आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी दौरा इथे केलेला होता. यावेळेस भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची या दौऱ्याला जोरदार तयारी केलेली आहे, कारण प्रदेशाध्यक्ष म्हणून हा पहीलाच दौरा आहे. बाईक रॅली, जिल्हा संघटनेचा मेळावा, सोशल मीडियाची बैठक, बुथ समिती बैठक, युवा वॉरिअर शाखांचे उद्घाटन असे कार्यक्रम बावनकुळेंच्या दौऱ्यांवर आयोजित केले जाणार आहेत. रत्नागिरी – सिंधुदुर्ग या लोकसभा मतदारसंघांवर भाजप आधीपासुनच दावा करत आलीय.
दरम्यान शिंदे गटाने सुद्धा, हे मतदारसंघ त्यांचा असल्याचा दावा केला आहे. या राजकीय दृष्टीक्षेपातून हा दौरा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. ‘धन्यवाद मोदीजी’ या अभियाना अंतर्गत विविध योजना बनविले आहे, त्या योजनेचे लाभार्थी जे आहे, त्यांना चंद्रशेखर बावनकुळे भेट देणार आहेत व त्यांच्याशी संवाद देखील साधणार आहे.