Deprecated: Creation of dynamic property Theplus_Elementor_Plugin_Options::$fields is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/includes/theplus_options.php on line 66

Deprecated: Creation of dynamic property Plus_Generator::$transient_extensions is deprecated in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/enqueue/plus-generator.php on line 873
'आपण यांना पाहिलंत का?' मुंबईत भास्कर जाधव यांचे बॅनर...

TOD Marathi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव (complaint filed against Shivsena Thackeray group leader Bhaskar Jadhav in Mumbai and other places) यांच्याविरोधात मुंबईमध्ये (Mumbai) भाजप (BJP) कार्यकर्त्यांनी बॅनर लावले आहेत. भास्कर जाधव यांना शोधून देणाऱ्याला 11 रुपये बक्षिस देण्यात येईल, असा मजकूर या बॅनरवर आहे. भास्कर जाधव यांनी भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

मुंबईतल भाजपने लावलेल्या बॅनरवर भास्कर जाधव यांच्या फोटो आहे. “आपण यांना पाहिलंत का? शोधून आणणाऱ्याला रोख रु. 11/- बक्षिस”, अशा स्वरूपाचा मजकूर या बॅनरवर लिहिलेला आहे.

ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. मात्र 18 ऑक्टोबर रोजी वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोठा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजप आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. सोबतच यावेळी जाधव यांनी राणेंची नक्कल देखील केली होती. “नारायण राणेंचं एकच कीर्तन असतं. मी शिवसेना सोडली आणि शिवसेना संपली. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद दिलं आणि शिवसेना संपली. आहो नारायण राणे.. शिवसेना संपली म्हणताय.. 39 वर्ष शिवसेनेसाठी काम केलं म्हणता.. मग एवढी वर्षं काय दाढ्या करत होतात? तेव्हा अंधेरी-गोरेगावमध्ये म्हशींचे तबेले होते. शिवसेनेने काहीच केलं नाही, तर 39 वर्ष काम करुन मुख्यमंत्रीपदापर्यंत गेलेले तुम्ही काय म्हशी भादरत होता?” अशी जळजळीत टीका भास्कर जाधव यांनी केली होती.

त्यामुळे भास्कर जाधव यांच्याविरोधात नवी मुंबई, पुणे आणि कुडाळमध्ये गुन्हा दाखल
नारायण राणे यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात विविध ठिकाणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. नवी मुंबई, पुणे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथेही पोलीस स्थानकात जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नारायण राणे यांच्याबद्दल अपमानास्पद, शिवराळ तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याचा आरोप करत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल व्हावा,” अशी तक्रार कुडाळ पोलीस स्थानकात स्थानिक भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज