रमेश लटके आज असते तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत उभे असते, असा दावा भाजपा आमदार नितेश राणे यांनी केला आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ते रॅलीत सहभागी झाले होते. (Nitesh Rane on Andheri Bye Election) यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले. मातोश्रीवर त्यांचा अपमान झाला होता. याबद्दल त्यांनी स्वतः मला सांगितलं होतं, असा दावाही नितेश राणे यांनी केला आहे.
ही निवडणूक एकतर्फी आहे, रमेश लटकेंचं काम कोणी नाकारणार नाही मात्र मातोश्री (Matoshri) मध्ये त्यांच्या किती अपमान झाला हे त्यांनी मला सांगितलं होतं, उद्धव ठाकरे अपमान करतात, फोन उचलत नाहीत, भेटत नाहीत असेही त्यांनी सांगितलं होतं. माणूस जिवंत असतो तेव्हा तुम्ही किंमत देत नाही आणि नंतर घाणेरड्या राजकारणासाठी त्यांच्या कुटुंबाचा वापर करतात. असाही गंभीर आरोप नितेश राणे यांनी यावेळी केला.
आम्ही गद्दारांसोबत नाही हे दाखवण्यासाठी ही निवडणूक आहे असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केलं होतं, (Nitesh Rane criticized Aditya Thackeray) यावर बोलताना जेव्हा बाळा सावंत यांच्या निधनानंतर तृप्ती सावंत निवडणूक लढवून आमदार झाल्या. तेव्हा त्यांचे फोन देखील उचलले जात नव्हते. आता हे लटके ताईंचा घाणेरड्या राजकारणासाठी वापर होत आहे. याचं ज्वलंत उदाहरण तृप्ती सावंत (Trupti Sawant) आहेत. मातोश्रीला कोणाला किती आदर मिळतो हे तृप्ती सावंत यांना विचारा, तेव्हा कोण गद्दार आणि कोणाला सहानुभूती मिळते याचंही उत्तर मिळेल, असं ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंनी जास्त म्याव म्याव केली तर ते बंद करण्याची सर्व औषधे माझ्याकडे आहेत असं नितेश राणे म्हणाले