गोव्याच्या समुद्र तटावर नियमित उड्डाण भरणारे मिग 29K चे लढाऊ विमान समुद्र किनाऱ्यावर कोसळले आहे (A MiG 29K fighter plane has crashed on the beach). विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने ही दुर्घटना झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसल्याचे नौदलाकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
नियमितपणे उडान भरणाऱ्या विमानापैकी हा एक विमान होता. उडानादरम्यान काही तांत्रिक अडचणी आले आणि अचानक विमान तिथेच क्रॅश झाल्याचं पायलेटने सांगितलं आहे. या घटनेत पायलट बचावला आहे. मात्र, विमान दुर्घटनेवर अनेक सवाल केले जात आहे. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून त्यातून सर्व माहिती समोर येणार असल्याचं सांगितले आहे.
भारत सरकारने रशियाकडून एकूण 25 मिग-29K लढाऊ विमान खरेदी केले होते. 2011मध्ये या पैकी एक विमान दुर्घटनाग्रस्त झालं होतं. त्यात दोन पायलटांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या विमानांच्या विश्वासहार्यतेवर प्रश्न उपस्थित केले गेले होते. मिग 29Kचे एअरफ्रेम, आरडी एमके-33 इंजिन आणि फ्लाय बाय वायर सिस्टिमशी संबंधित समस्या या विमानात असल्याचा ठपका कॅगने ठेवला होता. या विमानांची सर्व्हिसेबिलटी खूप कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं होतं.