टिओडी मराठी, लातूर, दि. 4 मे 2021 – तुम्हाला जर सक्षम विद्यार्थी अन डॉक्टर, इंजिनिअर व्हायचं असे तर कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं? असा प्रश्न जर कोणाला विचारला तर आपसूकच शिवराज मोटेगावकर या सरांचं नाव सुचविलं जातं. शिवराज मोटेगावकर सरांनी RCC या खाजगी क्लासच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडविले आहेत. म्हणून महाराष्ट्रातील उत्तम क्लास म्हंटलं कि, शिवराज मोटेगावकर सरांच्या RCC लातूर पॅटर्नचं नाव येतं. हि लातूरकरांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. लातूर, नांदेडमधील शिक्षणाचा शिरोमणी असणाऱ्या शिवराज मोटेगावकर सरांना वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा!!.
शिवराज मोटेगावकर म्हणजे लातूर-नांदेडच्या शैक्षणिक विकासातील एक महत्वाचं नाव म्हणून ओळखलं जातं. खासगी क्लासच्या कल्चरचा पायंडा मोडून डॉक्टर, इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि त्यांचं स्वप्नं सत्यात उतरवायला शैक्षणिक मार्गदर्शन RCC च्या माध्यमातून शिवराज मोटेगावकर करत आहेत. त्याचीच पोचपावती म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले हजारो इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स हेच होय.
गेली दोन दशकं RCC ने हजारो विद्यार्थ्यांची स्वप्नं पूर्ण करून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीय. NEET किंव्हा JEE विद्यार्थ्यांचा पाया पक्का करण्याचं काम RCC च्या माध्यमातून शिवराज मोटेगावकर करत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये ते नेहमी शिक्षणाची गोडी निर्माण करतात. शिकवताना ते विद्यार्थ्यांमध्ये खूप रमून जातात, म्हणूनचं तर विद्यार्थ्यांना शिवराज मोटेगावकर सर आपलेसे वाटतात. मुलांच्या शिक्षणात खंड न पाडता त्यांनी त्याचं स्वप्न पूर्ण व्हावं, हि मोटेगावकर सरांची इच्छा असते. यासाठी ते आजवर मुलांना शिकवत आहेत, त्यांना घडवत आहेत. शिक्षणासह शिवराज मोटेगावकर सर सामाजिक कार्य करण्यातही मागे नसतात.
महाराष्ट्रातील एक उत्तम ज्ञान प्रदान करणारी संस्था म्हणून RCC ची ख्याती निर्माण झालेली आहे. त्यामुळे RCC मध्ये शिकण्यासाठी हजारो विद्यार्थी येतात. RCC ची गुणवत्ता टिकवण्यासाठी आणि इतर कामकाज सांभाळण्यासाठी तज्ञ लोकांची मदत लागते. त्यामुळे RCC च्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार मिळत आहे. ज्ञानदानासह इथे लोकांची रोजगारनिर्मिती करण्याचं काम RCC तर्फे होतं असून हे लातूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
मोटेगावकर सरांनी आर्थिकदृष्ट्या गरीब घरातील हुशार अशा विद्यार्थ्यांना सरांनी स्कॉलरशिप देऊन मदत करत आहेत. वैद्यकीय पूर्व परीक्षा चांगल्या मार्कांनी पास होऊन सुद्धा घराच्या आर्थिक परिस्थितीमुळे जे विद्यार्थी फीस भरू शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांचा MBBS चा पूर्ण खर्च प्रा. माटेगावकर सर स्वतः करत आहेत. तसेच धार्मिक भान जपण्यासाठी त्यांनी आजवर विशेष प्रयत्न केलेले आहेत.
विविध मंदिरांच्या सुशोभीकरणासाठी त्यांनी लाखो रुपयांची मदत केली आहे. HIV सेवालय, मानव वेदना मुक्ती केंद्र आणि स्वाधार अंध, अपंग पुनर्वसन केंद्र अशा अनेक संस्थाना त्यांनी सढळ हाताने मदत केली आहे. पोलीस पाल्य, भारतीय सैनिकांचे पाल्य तसेच निराधार पाल्यांना मोटेगावकर सरांच्या RCC कडून विशेष शैक्षणिक सवलत दिली जात आहे.
“विद्यार्थ्यांसह समाजाचा उद्धार करणारा सर्वोत्तम शिक्षक” अशी शिवराज मोटेगावकर सरांची ओळख राज्यात निर्माण झालेली आहे. मोटेगावकर सर म्हणजे ज्ञानाचा असा झरा आहे. आपलं आयुष्य शिस्तप्रिय आणि तितकेच दिलखुलासपणे जगणारे, आदर्श शिक्षक, मार्गदर्शक, कर्तृत्ववान, धाडसी, निर्णयक्षम, उत्साह निर्मिणारा, आत्मविश्वासपूर्ण, मेहनती, बुद्धिमान व्यक्तिमत्व, कर्त्तव्यदक्ष, समाजसेवक अशी कितीही विशेषणं शिवराज मोटेगावकर सरांसाठी आली तरी कमीच आहेत, असं म्हणता येईल.
लातूर, नांदेडमधील शिक्षणाचा शिरोमणी असणाऱ्या शिवराज मोटेगावकर सरांना वाढदिवसानिमित हार्दिक शुभेच्छा. सरांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.