शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सत्तांतरानंतर पहिल्यांदाच जाहिर सभा घेत आहेत. मुंबईच्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर ही सभा होत आहे. यामध्ये सभेच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरे यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. स्वराज्यावर अनेक शाह जाणून आले, त्यांना माहिती नाही जमिनीवर गवताची नाही तर तलवारीची पाती आहेत, असं म्हणत एक प्रकारे खुलं आव्हान अमित शहा आणि भाजपला दिलं आहे.
सोबतच जो आमच्या आईवर वार करायला येईल त्याचा राजकारणामध्ये आम्ही कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही असे देखील म्हटलं आहे. मुंबई वर गिधाड फिरत आहेत, मुंबईचे लचके तोडण्याचे प्रयत्न करत आहेत मात्र आम्ही ते होऊ देणार नाही असं देखील म्हटलं आहे.
मुंबई जेव्हा संकटात असते तेव्हा धावून जातो तो शिवसैनिक यांना केवळ प्रॉपर्टी साठी मुंबई पाहिजे आहे अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
एकंदरीत दसरा मेळाव्यापूर्वी दसरा मेळाव्याचा ट्रेलर असलेलं हे भाषण आहे. संजय राऊत यांचा देखील विशेष उल्लेख उद्धव ठाकरे यांनी केला. ‘नाही तर तुम्ही उद्या बातमी छापाल चौकटीत की गेले संजय राऊत मिंधे गटात’ असा टोला लगवलाय. संजय राऊत यांचा आपल्याला अभिमान आहे, मोडेन पण वाकणार नाही असा बाणा ठेवून संजय राऊत (Sanjay Raut) लढतात. असे देखील म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची आठवण केली.