TOD Marathi

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नेस्को मैदानावर भाषण केलं. आणि या भाषणात त्यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार टीका केली. मात्र, उद्धव ठाकरेंच्या टीकेच्या केंद्रस्थानी अमित शहा होते, ‘तुमची जी काही शहाणीती असेल ती तिकडेच ठेवा’ आणि एक महिन्यात निवडणुका घ्या असं खुलं आव्हान उद्धव ठाकरे यांनी अमित शहा यांना दिले. शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख देखील खोके सरकार असाच केला.

उद्धव ठाकरे यांनी भाजपचा उल्लेख कमळाबाई असा केला. आणि कमळाबाई हा मी दिलेला शब्द नाही तर माझे वडील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला शब्द आहे. आणि हीच बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची खरी शिवसेना आहे, असा देखील उच्चार यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.

सगळ्या गोष्टी मुंबईत होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केल्या जात आहेत. यांना फक्त निवडणुका आल्यानंतर मुंबई आठवते. मात्र, इतर वेळी मुंबई आठवत नाही. मुंबईत केवळ प्रॉपर्टी पाहिजे असं म्हणत भाजपसह शिंदे गटावरही जोरदार निशाणा साधला.