TOD Marathi

विठ्ठल मंदिरात (Vitthal Temple Pandharpur) वारकरी हरिनाम जप करत असताना अचानक जप भजन किर्तनाला बंदी असल्याचा अधिकाऱ्यांचा फोन आला आणि नंतर वारकऱ्यांना चालू किर्तन बंद करावे लागल्याची घटना घडली होती. यामुळे नवा वाद समोर आला होता. मात्र प्रशासनाने हा दावा फेटाळला असून, आज विठ्ठल चरणी नाम जप, भजन, किर्तनाला परवानगी असल्याचे सांगण्यात येत आहे. फक्त स्पिकरवर बंदी आहे (speakers are banned, says administration officials) आणि याविषयी वारकऱ्यांनी आपली भुमीका स्पष्ट केली आहे.

विठ्ठलाच्या चरणी जप भजन किर्तन ही विठ्ठलाच्या आवडीची गोष्ट होणार नाही हा निर्णय विठ्ठल भक्तांसाठी दुखावणारा होता. अनेक भक्त दुरवरून विठ्ठल चरणी येतात आणि इथे नामजप करतात. परंतू अचानक अधिकाऱ्यांचा आलेला नामजप बंदीसाठीचा फोन यावर असा कोणताही निर्णय न दिल्याचा प्रशासनाचा दावा ही वारकऱ्यांसाठी (Varkari) गोंधळाची परिस्थिती होती. भजन किर्तन करता येईल फक्त स्पिकरवर बंदी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मग अधिकाऱ्यांनी बंदीचा फोन का केला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

विठ्ठल मंदिरात वारकऱ्यांना भजन कीर्तन करायला परवानगी नसेल तर कुठे करायचे असा सवाल वारकरी पाईक संघाच्या रामकृष्ण महाराज वीर यांनी केला आहे. तसेच संत नामदेव महाराजांचे वंशज केशव महाराज नामदास यांच्यासह वारकरी महाराजांनी यास विरोध केला आहे. दरम्यान या अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करण्याची मागणी देखील वारकरी मंडळीनी केली आहे.