TOD Marathi

नाशिकमध्ये लाच घेणारा अधिकारी कोट्याधीश, पैसे मोजण्यासाठी मागवले मशीन

आदिवासी विभागातील (Tribal Department) लाचखोर कार्यकारी अभियंता दिनेशकुमार (Dineshkumar Bagul) यांच्या नाशिकच्या (Nashik) राहत्या घरातून 98 लाख 63 हजार तर पुण्यातील घरी 45 लाख 40 हजारांची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. नाशिक आणि पुणे (Pune) अशा दोन्ही ठिकाणाहुन एक कोटी 44 लाखांची कॅश सापडली असल्याची माहिती आहे. शिवाय अद्यापही बागुल यांच्या अनेक घरांत झाडाझडती सुरु असून पैसे मोजण्यासाठी मशीनचा वापर केला जात असल्याचे समजत आहे.
गेल्या काही दिवसांपासून नाशिकसह जिल्ह्यातील (Nashik News) लाचेच्या प्रकरणांमध्ये (Bribe Case) वाढ झाली आहे. काल आरोग्य विभागाच्या (Health Dea) उपसंचालकांचे लाच घेतल्याचे प्रकरण ताजे असताना आज आदिवासी विकासच्या बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंताला ताब्यात घेतले आहे. गेल्या 15prtment दिवसांपासून एसीबी बागूलच्या मागावर होते. सेंट्रल किचनच्या (Central Kitchen) कामासाठी 12 टक्के दराने लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. कारवाईनंतर दिनेशकुमार बागुलच्या नाशिक आणि पुण्याच्या घरी एक कोटीहून अधिक रोख रक्कम आणि काही महत्वाची कागदपत्रे सापडल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे मशीनच्या सहाय्याने पैशांचे मोजमाप करावी लागणार लागणार असून काल दुपारपासून बागुल यांच्या घरी सुरू असलेली एसीबीची झाडाझडती मध्यरात्रीपर्यंत सुरु होती.

आदिवासी विभागात उच्च पदावर काम करणारे दिनेश कुमार बागुल यांना काल एसीबीने 28 लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. साधारणपणे अडीच कोटींचे काम मंजूर करण्यासाठी लाच मागितली होती. 28 लाखांची लाच घेणारा आदिवासी विभागाचा कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांच्या तिडके कॉलनी परिसरातील एका अलिशान अपार्टमेंटमधील घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई झाल्यांनतर मध्यरात्रीपर्यंत छापेमारी सुरू होती. तसेच नाशिकसह त्यांच्या पुणे आणि धुळ्यातील घरी एसीबीकडून छापेमारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लाचखोर बागुल यांच्याकडे मोठं घबाड हाती लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान दिनेशकुमार बागुल यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असून पुढील चौकशीसाठी कोठडीची मागणी एसीबीकडून केली जाणार आहे. आदिवासी विकास विभागातील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दिनेशकुमार बागुल यांना तब्बल 28 लाख 80 हजारांची लाच घेतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काल दुपारी तिडके कॉलनी परिसरातील घरी रंगेहाथ अटक केली होती. सेंट्रल किचनच्या दोन कोटी चाळीस लाखांच्या वर्कऑर्डरसाठी बागुल यांनी लाच मागितली होती.

Warning: Undefined array key "arrow_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7016

Warning: Undefined array key "arrow_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7017

Warning: Undefined array key "arrow_hover_bg_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7018

Warning: Undefined array key "arrow_hover_icon_color" in /home/kiftjbmy/public_html/todmarathi/wp-content/plugins/theplus_elementor_addon/modules/widgets/tp_dynamic_listing.php on line 7019

Tags

वेब स्टोरीज