TOD Marathi

मुंबई :

मनी लॉन्ड्रिंग केसमध्ये (Money Laundering Case) ईडीच्या अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख तुरुंगात चक्कर येऊन पडल्याची माहिती मिळत आहे. त्यांना मुंबईतल्या जे जे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. त्यांचा रक्तदाब वाढल्याचीही माहिती मिळत आहे. डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत. गेले अनेक दिवस त्यांच्या छातीतही दुखत होतं, अशी माहितीही समोर येत आहे. (Anil Deshmukh Admitted in J J Hospital Mumbai)

सकाळी ११ च्या सुमारासची ही घटना आहे. अनिल देशमुख यांना तुरुंगातच चक्कर आल्याने ते जागेवर खाली पडले. त्यानंर तेथील तुरुंग अधिकाऱ्यांनी तत्काळ डॉक्टरांना पाचारण केलं. तेथील डॉक्टरांनी तपासणी केली असताना त्यांचा उच्च रक्तदाब होता. त्यानंतर काही वेळातच त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील दोन ते तीन दिवस त्यांना रुग्णालयातच ठेवलं जाईल, असा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतल्याची माहिती आहे.

आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांखाली गेल्या दहा महिन्यांपासून अनिल देशमुख तुरुंगात आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री असतानाचा अनिल देशमुख यांची ऐट आणि रुबाब लक्षात घेता सध्याची त्यांची अवस्था निश्चितच धक्कादायक आहे.