TOD Marathi

राज्यात अनेक घडामोडी घडत असताना यामध्ये आणखी एका महत्त्वाच्या घडामोडीची भर पडली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती झाली आहे. (Shivsena and Sambhaji Brigade alliance) तशी घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shivsena Chief Uddhav Thackeray) यांनी केली आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्यासह शिवसेनेच्या आणि संभाजी ब्रिगेडच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली.

आमचं आणि संभाजी ब्रिगेडचे ध्येय एकच आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलताना केलं. यापुढे महाराष्ट्रात संयुक्त मेळावे घेण्यात येतील असेही म्हटलंय.

शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीमुळे महाराष्ट्रात नवं राजकीय समीकरण उदयास येणार आहे. (New Political Equation in Maharashtra) संभाजी ब्रिगेडचा उद्धव ठाकरेंकडून लढवय्ये सहकारी अशी उपमा देत उल्लेख करण्यात आला. आम्ही एकत्र येत नवा इतिहास घडवू, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही युती नाही. आमचं हिंदुत्व पटल्याने संभाजी ब्रिगेडने युती केली. सोबतच आमच्याकडे काही नसताना एकत्र आलात, म्हणून कौतुक करतो. असंही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

यापुढे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्र निवडणुका लढवणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. महाराष्ट्राचे राजकारण (Maharashtra Politics) वेगळ्या वळणावर असताना त्यामध्ये आता शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची झालेली युती यामुळे पुढचं चित्र कसं असेल याची उत्सुकता निश्चितच सर्वांना लागलेली आहे.