कोल्हापूर : सध्या जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अतिवृष्टीसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाच्या ( Shivaji University Kolhapur ) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील नोटीसही जारी करण्यात आली आहे.
कोल्हापूरमध्ये 10 ऑगस्ट आणि 11 ऑगस्ट या दोन्ही दिवशी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढू नये, त्यांनी धोकादायक परिस्थितीमध्ये बाहेर पडू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
पंचगंगा नदीसह ( Panchaganga River ) जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. 70 पेक्षा जास्त बंधारे पाण्याखाली असल्याचे चित्र आहे. पाच राज्य मार्ग आणि प्रमुख 21 जिल्हा मार्ग देखील पाण्याखाली गेले आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी येणं अडचणीचं होऊ शकतं, म्हणून विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान पावसाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठाच्यावतीने सांगण्यात आले आहे.