मुंबई: यस बँक-डीएचएफएल घोटाळा प्रकरणात सीबीआयनं पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. अविनाश भोसले (Avinash Bhosale) यांनी लंडनमध्ये संपत्ती खरेदी करण्यासाठी डीएचएफएलकडून मिळालेल्या ५५० कोटी रुपयांपैकी ३०० कोटी रुपये खर्च केल्याची माहिती या आरोपपत्रात आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेनं भोसलेला डीएचएफएल आणि यस बँकेशी (DHFL and YES bank) संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी अटक केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला सीबीआयनं विशेष न्यायालयात भोसलेंच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं.
सीबीआयनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात सत्यन गोपालदास टंडन, मेट्रोपोलिस हॉटेल्स एलएलपी, एबीआयएल इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, एबीआयएल हॉस्पिटिलिटी प्रायव्हेट लिमिटेड, अरिंदम डेव्हलपर्स, अविनाश भोसले ग्रुप आणि फ्लोरा डेव्हलपमेंट लिमिटेडचा समावेश आहे.