श्रावण महिना हा सणवार, व्रतवैकल्यांचा महिना असतो. या महिन्याला हिंदू धर्मात मोठं महत्व आहे. पूजा पाठ केले जातात. एकंदरीत मोठ्या आनंदाचा आणि उत्साहाचा हा श्रावण महिना असतो. याच श्रावण महिन्याची सुरुवात कधीपासून होतेय? या महिन्यात कोणत्या दिवशी कोणते सणवार आहेत? (Festivals in Shrawan Month) असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही माहिती तुमच्याठीच आहे.
श्रावण महिन्याची सुरुवात यावर्षी 29 जुलैपासून होतेय. श्रावण जवळ येत असल्यामुळे आवश्यक साहित्य खरेदीसाठी, तसेच सजावटीचे सामान खरेदी करण्यासाठी बाजारात विविध ठिकाणी भाविकांची लगबग सुरु झाली आहे. (Holy Shrawan Month)
श्रावण महिन्यातील सणवार :
1 ऑगस्ट : पहिला श्रावण सोमवार
2 ऑगस्ट : नागपंचमी
5 ऑगस्ट : दुर्गाष्टमी
8 ऑगस्ट : पुत्रदा एकादशी, श्रावणी सोमवार शिवामूठ (तीळ)
9 ऑगस्ट : मंगळागौर
11 ऑगस्ट : नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन
15 ऑगस्ट : तिसरा श्रावणी सोमवार (शिवामूठ मूग), संकष्टी चतुर्थी चंद्रोदय 09:44,
पतेती, स्वातंत्र्य दिन
16 ऑगस्ट : मंगळागौरी, पारशी नववर्ष
19 ऑगस्ट : गोपाळकाला, श्रावण सोमवार (शिवामूठ जव)
26 ऑगस्ट : पोळा (श्रावण अमावस्या) दश अमावस्या
28 ऑगस्ट : भाद्रपद महिना सुरु
श्रावणाचे महत्त्व :
या महिन्यात विविध सण, उत्सव साजरे होत असतात. एकंदरीतच आनंदित वातावरण पाहायला मिळतं. श्रावणात निसर्ग देखील बहरून निघतो त्यामुळे श्रावणातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे असते.