मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन आणि संप सुरू आहे. सणासुदीच्या काळात या संपामुळं प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत. दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत औद्योगिक न्यायालयाने दिलेल्या निर्देशाची मुंबई उच्च न्यायालयानेही गंभीर दखल घेतली आहे.
आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचारी आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. सरकारने त्यांच्या काही मागण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र आता महामंडळाचे शासनात विलनीकरण करावे यासाठी पुन्हा आंदोलनाला जोर मिळण्याची शक्यता आहे.
आज राज्यातील २५० डेपोंपैकी ५९ डेपोंचं कामकाज बंद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या आदेशांकडे एसटी कर्मचाऱ्यांनी पाठ दाखवली असल्याने कोर्टाकडून नोटिस बजावण्यात आली आहे.