प्रत्येक खेळाप्रमाणेच क्रिकेटच्या खेळातही खेळाडू विशिष्ट वयापर्यंत त्याचा आनंद घेऊ शकतात. आणि आपल्या देशासाठी सेवा देण्यास सक्षम असतात. अशा परिस्थितीत क्रिकेटच्या इतिहासात असे बरेचदा पाहिले गेले आहे की, काही खेळाडू वेळेआधीच संघातून बाहेर पडतात. आणि परत संधी न मिळाल्यास निवृत्ती घेतात. तर बरेच खेळाडू वयाच्या 36-40 च्या दरम्यान निवृत्ती जाहीर करतात. असे बरेच खेळाडू आहेत ज्यांनी केवळ नावासाठी क्रिकेटमध्ये पाऊल ठेवले आहे.
निवृत्तीनंतर बर्याचदा खेळाडू एक सल्लागार, प्रशिक्षक किंवा एखाद्या मंडळाच्या कार्याशी संबंधित असल्याचे दिसून येते. परंतु इतिहासात असे काही क्रिकेटपटू आहेत. ज्यांनी खेळाच्या मैदानावर सामर्थ्य दाखवल्यानंतर राजकारणाच्या क्षेत्रात आपली शक्ती दाखवली आणि देशाचे पंतप्रधान झाले. तर अशाच 5 क्रिकेटपटूंबद्दल आज आपण जाणून घेऊया. जे निवृत्तीनंतर देशाचे पंतप्रधान बनले.
इम्रान खान (पाकिस्तान)
या यादीत पहिलं नाव येतं ते पाकिस्तान क्रिकेट संघाचे दिग्गज माजी कर्णधार आणि अष्टपैलू इम्रान खान(Imran Khan) यांचं. ज्यांच्या नेतृत्वात पाकिस्तान संघाने 1992 ला एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. इम्रान यांची क्रिकेट कारकीर्द उत्तम आहे, केवळ एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर कर्णधार म्हणूनही, ते आजपर्यंत पाकिस्तानच्या तरुणांसाठी “रोल मॉडेल” म्हणून कायम आहेत. विश्वचषक जिंकल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनंतर त्यांनी क्रिकेटच्या प्रत्येक स्वरूपातून निवृत्ती घेतली. आणि त्यानंतर राजकारणात प्रवेश केला. जवळपास 26 वर्षांच्या मेहनतीनंतर इम्रान 2018 ला पाकिस्तानचे पंतप्रधान झाले.
सर एलेक डग्लस होम (इंग्लंड)
यातील दुसरं नाव क्रिकेटला जन्म देणारा देश म्हणजेच इंग्लंडचे आहे. क्रिकेट इतिहासामध्ये इंग्लंडमध्ये बरेच मोठमोठे प्रतिभावंत खेळाडू होऊन गेले. इतकेच नाही तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटशिवाय “काउन्टी” क्रिकेट खेळूनही खेळाडूंनी आपले नाव कमविले आहे. काऊन्टी क्रिकेटमध्ये “मिडलसेक्स” आणि “ऑक्सफोर्ड विद्यापीठासाठी” क्रिकेट खेळणार्या ‘सर एलेक डग्लस होम'(Sir Alec Douglas Home) यांचं नाव पुढं येत.
त्यांनी 1924-1927 दरम्यान 10 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि 16.33 च्या सरासरीने 147 धावा केल्या. ते त्यांच्या संघासाठी एक उत्कृष्ट घरगुती क्रिकेटपटू होते. त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीला ते जास्त पुढे नेहू शकले नाहीत. आणि लवकरच त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर डग्लस यांनी 1963 ते 1964 पर्यंत इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून काम केले.
सर फ्रान्सिस बेल (न्युझीलंड)
इंग्लंडप्रमाणेच न्यूझीलंड क्रिकेटचा इतिहासही खूप जुना आहे. यामध्ये तिसरं नाव थोड्या काळासाठी न्यूझीलंडचे पंतप्रधान राहिलेले सर फ्रान्सिस बेल(Sir Francis Bell) यांचे आहे. फ्रान्सिस बेल हा न्यूझीलंडमध्ये जन्मलेला असा पहिला नागरिक होता, जो केवळ 20 दिवसाच्या सत्तेत पंतप्रधान झाला होता. राजकारणी होण्यापूर्वी फ्रान्सिसनेही क्रिकेट खेळलं होतं. त्याने वेलिंग्टनकडून फक्त 2 प्रथम श्रेणी सामने खेळले आणि क्रिकेटला अलविदा केला होता.
नवाज शरीफ (पाकिस्तान)
यातील पुढील नाव पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ(Nawaj Shareef) यांचे आहे. हे नाव पाहून तुमच्यातील अनेकांना धक्का बसेल, पण हे खरं आहे. नवाझ शरीफ यांनी राजकारणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी क्रिकेटपटू बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. याबाबतीत त्यांचे गांभीर्य हे दर्शविते, की त्यांनी पाकिस्तानच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेला एक प्रथम श्रेणी सामना, तथापि नवाझ शरीफ यांची क्रिकेट कारकीर्द त्यांच्या राजकीय कारकिर्दीपेक्षा खूपच वेगळी आहे. पहिल्याच प्रथम श्रेणी सामन्यात ते न उघडताच बाद झाले. त्यानंतर त्यांनी कधीही मैदानाकडं पाहिलं नाही.पण क्लब क्रिकेटमध्ये त्यांनी बऱ्याच धाव केल्या आहेत.
कामिसेसे मारा (फिजी)
यातील अंतिम नाव “फिजी” क्रिकेट संघाचे आहे, ज्याचे सध्या कोणतेही विशेष अस्तित्व नाही. 1953 – 54 या काळात कामिसेसे मारा(Kamisese Mara) फिजी क्रिकेटचा संघाचा खेळाडू बनला. ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये क्लब क्रिकेट व्यतिरिक्त दोन प्रथम श्रेणी सामनेदेखील खेळले आहेत.पण त्याच दरम्यान त्याला दुखापत झाली. आणि पुन्हा कधीही तो क्रिकेट खेळू शकला नाही.
क्रिकेट सोडून गेलेल्या या फिजी खेळाडूने नंतर राजकारणात प्रवेश केला. आणि तो यशस्वीही झाला. त्यांनी 1970 ते 1992 पर्यंत फिजीसाठी पंतप्रधान म्हणून काम केले. आणि नंतर २००० साली ते देशाचे राष्ट्रपती बनले.