टिओडी मराठी, मुंबई, दि. 17 मे 2021 – सध्या तौक्ते चक्रीवादळ कोठे आहे, किती वेगाने वाहत आहे. याचा राज्यासह कोणत्या ठिकाणी परिणाम होणार? याची माहिती देणारे आणि राज्यातील हवामानाचा अंदाज देणारे 3 रडार नादुरुस्त आहेत, अशी माहिती समोर आली आहे.
राज्यात 4 डॉप्लर रडारपैकी 3 रडार नादुरुस्त आहेत, असे हवामानतज्ञ किरणकुमार जोहरे यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे चक्रीवादळाची योग्य माहिती नाही मिळाली तर होणाऱ्या नुकसानीला कोण जबाबदार राहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव राज्यातील अनेक शहरांत दिसून येतोय. किनारपट्टी व्यतिरिक्त इतर अनेक शहरात ताशी 18 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे , वाहत आहेत. तसेच जोरदार पाऊस पडत आहे.
याबाबत पंतप्रधान आणि मुख्यमंत्री कार्यालयाला सूचित केल्याची माहितीही किरणकुमार जोहरे यांनी दिली. अशा आपत्कालीन परिस्थितीत जर यंत्रणा काम करत नसेल तर हाहाकार माजेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. अरबी समुद्रात अतितीव्र चक्रीवादळ सक्रिय असताना आयएमडीचे मुंबई रडार बंद आहेत, असे समोर येत आहे.
मुंबई रडार बंद पडल्याने ऐन चक्रीवादळाच्या धोक्यावेळी रत्नागिरी ते पालघर आणि नाशिक ते सातारा या पट्ट्यातील हवामानाचे अचूक अंदाज मिळेनासे झाले. अशा परिस्थितीत सॅटेलाईट इमेजवर अवलंबून राहावे लागणार आहे.
हे रडार बंद असल्याने रविवारी दुपारी १ वाजून २६ मिनिटांनंतर कोणतीही अपडेट आले नाही. मात्र, संध्याकाळी सातच्या सुमारास मुंबई रडारच्या इमेजेस आयएमडीने खुल्या केल्या. तरीही, रडार योग्य प्रकारे काम करेना, हे स्पष्ट दिसून येतंय. त्यामुळे, सध्या राज्यात असलेल्या परिस्थितीत हि माहिती चिंताजनक आहे.
https://www.facebook.com/ramayuresh/posts/10157397681369058