Pune Ganeshotsav 2022 : यंदा पुण्यातील विसर्जन मिरवणूक सुरु होऊन तब्बल 28 तास उलटले आहेत. मात्र अजूनही मिरवणुका काही संपायचं नाव घेत नाहीत. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा नवीन विक्रम करणार का ? असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी साधारण 10 वाजता मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. मात्र आज जवळपास 28 तास उटलून गेले तरी देखील मिरवणुका सुरुच आहे. लक्ष्मी रस्त्यासह केळकर रस्ता, टिळक रोड, शास्त्री रस्ता येथेही विविध मंडळांच्या रांगा आहेत. ही सगळी परिस्थिती पाहता मिरवणूक संपायला संध्याकाळ उलटून जाईल असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
कोरोनामुळे यंदा दोन वर्षांनी गणपती विसर्जनाची मिरवणुक मोठ्या थाटामाटात, जल्लोषात सुरु आहे. दोन वर्षांच्या खंडानंतर या मिरवणुका अनेक तास सुरू राहतील, असा अंदाज पोलिसांना होताच मात्र 28 तास उलटून गेल्यानंतर पोलिसांनी देखील संताप व्यक्त केला आहे. काही मंडळांच्या बेजबाबदारपणामुळे मिरवणूक खोळंबली.
विसर्जन मिरवणूक सुरु असताता पोलिसांनी कोणत्याच मंडळांच्या उत्साहात तीळ मात्र हस्तक्षेप केला नव्हता. सगळ्याच मंडळांना उत्साह साजरा करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र मिरवणुकांसाठी दुसरा दिवस उजाडल्यामुळे पोलिसांनीही जलद गतीनं मिरवणुका पुढे नेण्याचे सर्वांना आदेश दिले आहेत. कालपासून शहरातील जे महत्वाचे रस्ते मिवरणुकीसाठी बंद करण्यात आले होते ते रस्ते 28 तासांनंतरही काही प्रमाणात बंद आहेत त्यामुळे कामावर जाणाऱ्यांचा तसेच कामावरून 7येणाऱ्यांचा खोळंबा होत असल्याचं चित्र आहे. कारण अजूनही शेकडोंच्या संख्येने नागरीक बाप्पाला निरोप देण्यासाठी रस्तावर आहेत.