TOD Marathi

मुंबई : हल्ली एखाद्या रोगाची लागण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो कोरोना व्हायरस. कोव्हिडच्या (COVID) वाईट आठवणी अजून पुसल्या जात नाहीत, तोवरच आता एका नव्या रोगानं राज्यात धुमाकूळ घातलाय. पण हा रोग होतोय तो गाय गुरांना.

लम्पी चर्मरोग (Lumpy skin disease) असे या रोगाचे नाव असून या आजाराचा प्रादुर्भाव सध्या महाराष्ट्रात चांगलाच वाढलाय. प्राप्त माहितीनुसार आतापर्यंत गोवर्गीय प्रजातींमधील 29 बाधित जनावरांचा या लम्पी स्कीनमुळे मृत्यू झालाय.

या स्किन आजराचा वेगाने प्रसार होऊ नये म्हणून महाराष्ट्राचा समावेश नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलाय. त्यामुळे गोजातीय प्रजातींची सर्व गुरे आणि म्हशी यांना ज्या ठिकाणी ठेवले जातं. त्या ठिकाणापासून नियंत्रित क्षेत्रातील किंवा त्या क्षेत्राबाहेरील अन्य कोणत्याही ठिकाणी ने आन करण्यास मनाई असणार आहे.

तसेच गुरांचा किंवा मशीन चा बाजार भरवणे प्राण्यांच्या शर्यती लावणे प्राण्यांचे प्रदर्शन आयोजित करणे यांसारख्या कार्यक्रमांवर आता प्रशासनाकडून बंदी घालण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान म्हशीच्या मृत्यूस कारणीभूत ठरणारा हा रोग राजस्थान गुजरात उत्तराखंड उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हरियाणा पंजाब आणि बंगाल या राज्यातही पसरला आहे