TOD Marathi

Bangladesh जवळ बोट बुडून 21 जणांचा मृत्यू ; 50 जण बेपत्ता

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, ढाका, 29 ऑगस्ट 2021 – बांगलादेशच्या ब्राह्मणबेरिया जिल्ह्याजवळ एक बोट उलटल्याने सात मुलांसह किमान 21 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ब्राह्मणबेरियामधील लैशका बिलाजवळ शोधमोहीम सुरू असून सुमारे 50 जण बेपत्ता झालेत.

बोटीमध्ये प्रवाशांची संख्या क्षमतेपेक्षा अधिक झाल्याचे वृत्त आहे. एकंदर 100 पेक्षा अधिक प्रवाशांना घेऊन जाणारी ही बोट दुसऱ्या वाळूने भरलेल्या ट्रॉलरला धडकली. त्यानंतर बुडाल्याने मृतांची संख्या आणखी वाढू शकते, असे ब्राह्मणबेरियाच्या उपायुक्त यांनी सांगितले आहे.

जिल्हा प्रशासनाने मृतांच्या कुटुंबाला 20 हजार टका देण्याची घोषणा केलीय. तसेच अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी चौकशी समितीची स्थापना केलीय.

बांगलादेशातील अशा घटनांच्या मालिकेतील ही दुसरी घटना असून यापूर्वी मे महिन्यामध्ये मदारीपूर जिल्ह्याजवळ पद्मा नदीत स्पीडबोट आणि वाळू वाहक ट्रॉलर यांच्यात झालेल्या अपघातात किमान 25 जणांचा मृत्यू झाला होता.

एप्रिलमध्ये नारायणगंज जिल्ह्यामध्ये एका फेरी अपघातात 27 जणांचा मृत्यू झाला होता. कमकुवत सुरक्षा यंत्रणा आणि क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची गर्दी हे बांगलादेशमध्ये अशा अपघातांची संभाव्य कारणे मानली जात आहेत.