TOD Marathi

नवी दिल्ली : राष्ट्रीय हरित लवादानं ( NGT ) शिंदे फडणवीस सरकारला तब्बल १२ हजार कोटी रुपयांचा दंड ठोठावलाय. घनकचरा तसेच सांडपाण्याची योग्य विल्हेवाट न लावून पर्यावरणाला हानी पोहोचवल्या प्रकरणी कलम १५ अंतर्गत लवादाने ही कारवाई केली आहे.

त्यामुळे शिंदे सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडलं आहे. दोन महिन्यांत राज्याला हा दंड भरावा लागणार आहे. न्या.आदर्शकुमार गोयल यांच्या पीठानं काल हा आदेश दिला.

ही रक्कम कचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व पुनर्वापर यंत्रणा, गुणवत्ता निरीक्षण यंत्रणा, ग्रामीण भागातील गाळ व्यवस्थापन आदींवर पर्यावरण रक्षणासाठी खर्च करण्यात यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत . पर्यावरणाचे नियम न पाळल्याबद्दल शिंदे सरकारला (shinde government) हा दंड ठोठावण्यात आला आहे.

गेल्या आठ वर्षांपासून महाराष्ट्र सरकारने घनकचरा व्यवस्थापन आणि द्रव कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक काम केलेले नाही. यासंदर्भात दिलेली मुदतही संपल्याचे हरित लवादाने सांगितले आहे.पर्यावरणाची सतत होणारी हानी भविष्यात थांबवायला हवी.त्यामुळे भूतकाळात पर्यावरणाची झालेली हानी भरून काढावी, असे हरित लवादाने म्हटले आहे.