TOD Marathi

टिओडी मराठी, लातूर, दि. 2 जून 2021 – कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी लोकसहभागातून उभा केलेल्या ‘स्पंदन प्रकल्पाला’ 10 लाखांची मदत मिळाली आहे. मात्र, यासाठी आणखी मदतीची गरज आहे. ‘ना नफा, ना तोटा’ या धर्तीवर उभा राहत असलेल्या स्पंदन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पास लातूरकरांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी बी. पी. पृथ्वीराज यांनी केले आहे.

लातूर येथील ममता राणालयामधेय या प्रकल्पाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रकल्प प्रपुख डॉ. विश्‍वास कुलकर्णी, डॉ अशोक अरदवाड, डॉ. वैशाली टेकाळे, संजय अयाचित, अँड. संजय पांडे आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमात 10 लाखांची मदत जमा झाली आहे. या प्रकल्पाला आतापर्यंत प्रा. शिवराज मोटेगावकर, मीनल मोटेगावकर, विश्व् सुपर मार्केटचे गुरुनाथ मगे, शिवदास मिटकरी, वामन भुपकर, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतन माजी विद्यार्थी संघटनेचे संजय अयाचित, श्रीकांत हिरेपठ, अनंत देशपांडे, अँड. कालिदास देशपांडे, साजीदभाई शेख, नाना भोयरेकर, मनोज सप्तर्षी, संजय प्र. अयाचित, डॉ. कल्याण बरमदे, डॉ. अजय जाधव, डॉ. विक्रम राजपूत, अँड. अण्णाराव पाटोल, धर्मवीर भारती, नागनाथ गिते, स्नेहल उटगे, नामदेव काकडे या सर्वांकडून जिल्हाधिकारी पृथ्वोराज बी. पी. यांनी ऑक्सिजन प्रकल्पाच्या देणगी, मदतोचे धनादेश स्वीकारून त्यांचा सत्कार केला.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनीही या प्रकल्पासाठी स्वत: वैयक्तिक देणगी डॉ. विश्‍वास कुलकर्णी यांच्याकडे जमा केली आहे. या प्रकल्पाला लातुरकरांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. अशोक अरदवाड, डॉ. वैशाली टेकाळे. अँड. संजय पांडे, डॉ. अजय जाधव, शिवराज मोटेगावकर यांनो मनोगत व्यक्त केले. डॉ. विश्वास कुलकर्णी यांनो प्रास्ताविक केले. तर संजय अयाचित यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाचे आभार शिरीष कुलकर्णो यांनी आभार मानले.

या कार्यक्रमासाठी डॉ. मधुकरराव कुलकर्णी, डॉ. माया कुलकर्णी, डॉ. अनुजा कुलकर्णी, श्रीपाद कुलकर्णी यांसह मान्यवर उपस्थित होते.