टिओडी मराठी, दि. 11 जुलै 2021 – एकीकडे देश कोरोनाशी लढत असताना दुसरीकडे धोकादायक झिका विषाणूचा प्रादुर्भावही वाढत आहे, असे आढळत आहे. यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. केरळमध्ये झिका विषाणूचे 15 रुग्ण आढळले आहेत. एएनआयच्या वृत्तानुसार, केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. याअगोदर राज्यात 14 रुग्णांची नोंद होती. आता हा आकडा 15 वर गेला आहे.
झिका विषाणूची लक्षणे आणि परिणामांवर काटेकोरपणे लक्ष ठेऊन आहोत. राज्य सरकार हाय अलर्टवर आहे. केरळमध्ये ‘झिका’चा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी प्लॅनवर काम केले जात आहे. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर गंभीरतेने लक्ष केंद्रीत केले आहे, असे आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे.
केरळमध्ये झिका विषाणूची लागण होणारी पहिली व्यक्ती गर्भवती महिला आढळली होती. महिला आणि तिचे बाळ बरे होत आहेत.
झिका विषाणूचे 19 सॅम्पल पुण्यातील एनआयवीच्या प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यातील 13 सॅम्पल पॉझिटिव्ह आलेत. त्यानंतर आम्ही पुन्हा 14 सॅम्पल टेस्टसाठी पाठवले आहेत. त्यात ते सर्व निगेटिव्ह आलेत, असे पहिली आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले आहे.
यावेळी आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले, राज्य सरकारजवळ झिका विषाणूवर मात करण्याचा प्लॅन तयार केला आहे. आम्ही यासाठी पूर्ण तयारी करत आहोत.
केंद्र सरकारची टीम राज्यात येऊन पाहणी करणार आहे, अशी शक्यता आहे. परंतु या विषाणूबाबत भीती निर्माण होण्यासारखे काही नाही. सध्या परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे.