TOD Marathi

Lucknow मध्ये ‘अल कायदा’चे 2 Terrorists पकडले, स्फोटके जप्त ; ATS ची कारवाई, घातपाताचा कट उधळल्याची माहिती

संबंधित बातम्या

No Post Found

टिओडी मराठी, दि. 11 जुलै 2021 – लखनऊमध्ये दहशतवादी दडून बसले आहेत, अशी खबर दहशतवाद विरोधी पथकास (एटीएस) मिळाली होती. त्यानंतर तेथील काकोरी पोलीस ठाणे परिसरातील एक घराला एटीएसने वेढा घालून कारवाई केली आणि तेथे लपलेल्या दोन दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.

हे दोन्ही दहशतवादी अल कायदा संघटनेचे आहेत, अशी असल्याची माहिती मिळत आहे. दोघेही पाकिस्तानचे हस्तक आहेत. यासह एटीएसच्या हाती अधिक प्रमाणावर स्फोटके सापडले आहेत. या कारवाईमुळे एकप्रकारे घातपातचा मोठा कट उधळला गेला आहे, असे सांगितले जात आहे.

एटीएसकडून अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरू ठेवली आहे. एटीएस सोबत स्थानिक पोलीस देखील या शोध मोहीमेत सहभागी झाले आहेत. परिसरातील बरचशी घरं रिकामी केली आहेत.

तसेच बॉम्ब शोधक आणि नाशक पथकास देखील पाचारण केलेले आहे. तर, अटक करण्यात आलेल्या दोन्ही दहशतवाद्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सकाळी १० वाजेपासून ही विशेष मोहीम एटीएसने सुरू केली असून अद्यापही ती सुरू आहे.