TOD Marathi

मुंबई : मराठी नाट्य प्रेमींसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आहे जगातील पहिले वहिले नाटकाचं संग्रहालय महाराष्ट्रात उभं राहत आहे. गिरगाव चौपाटी येथे तयार होत असलेल्या या संग्रहालयाचे नाव मराठी नाट्य विश्व असणार आहे

सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे याने इंस्टाग्राम पोस्ट करत यासंबंधीची माहिती दिली सुबोध भावे पोस्टमध्ये म्हणतो की, मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं हे संग्रहालय असणार आहे.

तसेच जगभरातील नाटकाच्या अभ्यासक आणि रसिक यांच्यासाठी ही खास मेजवानी असणार आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही नावीन्यपूर्ण कल्पना असल्याची माहितीही भावे यांनी यावेळी दिली.

 

दरम्यान राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमानाने हे संग्रहालय तयार होत आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज या संग्रहालयाचे बोधचिन्ह आणि स्वरूपाचं लोकार्पण करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं.