कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी सत्ता तर मिळवली मात्र त्या विजयी झाल्या नव्हत्या. त्यामुळे आता भवानीपूर, जग्नीनपूरसह सरशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणी निर्णायक ठरणार आहेत. आता या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि संपूर्ण देशाचे याकडे लक्ष लागले आहे. गुरुवारी मतदान पार पडले असून आज निकाल लागणार आहे.
मतमोजणीची पहिली फेरी पार पडली असून त्यात भवानीपूर विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जी ३ हजार ६८० मतांनी आघाडीवर आहेत. तर त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रियंका टिबरेवाल यांना पहिल्या फेरीत ८८१ मते मिळाली आहेत. भवानीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाने ममता बॅनर्जींविरोधात प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत ममता बॅनर्जीच निवडून येणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. या जागेसाठी ५३ टक्के मतदान झाले आहे. यात बहुतांष बोगस मतदान झाल्याचा अरोप भाजपाने केला आहे.
यादरम्यान पद्दापुकुर येथील शाळेतील मतदान केंद्रावर बनावट मत करणाऱ्या दोघांना पकडल्याचा दावा भाजपाच्या पदाधिकाऱ्याने केला आहे. तसेच तृणमूलच्या नेत्याला मारहाण केल्याप्रकरणी एक भाजपा समर्थकाला अटक झाली आहे.