अक्षय वादग्रस्त विषयांपासून लांबच असतो. पण यावेळी त्याने कलासृष्टीमध्ये सुरु असलेल्या बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर बोलणं पसंत केलं आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अक्षयला बॉलिवूड विरुद्ध साऊथ वादावर विचारण्यात आलं. यावेळी तो म्हणाला, “देशाला विभागू नका. दक्षिण भारत, उत्तर भारत किंवा बॉलिवूड याबद्दल बोलूच नका. जर काही लोक असं बोलत असतील तर तुम्हीपण तेच बोलू नका. लोक काय बोलतात याची मला मुळीच पर्वा नाही. भारतीय चित्रपटसृष्टी ही एकच आहे असं माझं म्हणणं आहे.
मनोरंजन क्षेत्रातील बॉलीवूड विरुद्ध साऊथ या वादावर अक्षय कुमारने आता आपल मौन सोडलंय, “माझा या विभाजनावर विश्वास नाही. कोणी साऊथ इंडस्ट्री आणि नॉर्थ इंडस्ट्री म्हटल्यावर मला त्यांचा राग येतो. आपण सर्व एक आहोत आणि मला वाटते की आपण हा प्रश्न विचारनं थांबवल पाहिजे.” असं मत व्यक्त केलंय. तो पुढे असंही म्हणालाय, “या वादाला आपण सगळेच बळी पडत आहोत हे दुर्दैवी आहे. आपल्याला एकच इंडस्ट्री का म्हणता येत नाही? आपल्याला नॉर्थ आणि साऊथ इंडस्ट्री का म्हटले जात? आपल्या सर्व भाषा चांगल्या आहेत, आपण आपल्या मातृभाषा बोलत आहोत आणि आपण सर्व सुंदर आहोत. हे दुर्दैव आहे की आपण स्वतःमध्ये फूट पाडत आहोत.” असं म्हणत अक्षय कुमारने आपल मौन सोडलंय.