आता आणखी आकर्षक होणार WhatsApp ; टेस्टिंग सुरु, पुढील आठवड्यात उपलब्ध होणार

टिओडी मराठी, नवी दिल्ली, दि. 31 मे 2021 – नव्या प्रायव्हसी पॉलिसीवरून व्हॉट्सॲप वादात अडकले आहे. त्यामुळे युझर्सना कनेक्ट ठेवण्यासाठी व्हॉट्सॲप आणखी आकर्षक होणार आहे. व्हॉट्सॲप आणखी नवीन फीचर्स आणणार आहे. त्यामुळे युझर्सना या नव्या फीचर्ससह चॅटिंगचा अनुभव मिळणार आहे. सध्या या फीचर्सची टेस्टिंग घेतली जात आहे. हे फिचर येत्या काही आठवड्यात उपलब्ध होणार आहे.

व्हॉट्सॲपकडून लवकरच यूजर्सना ॲपचा कलर बदलण्याचे आकर्षक फीचर मिळणार आहे. या फीचरद्वारे यूजर चॅट बॉक्सचा आणि टेक्स्टचा रंग बदलणार आहे. यामुळे युजर्सच्या चॅटिंगचा अनुभव आणखी उत्तम होणार आहे.

सध्या हे फीचर टेस्टिंग मोडमध्ये असून ते लवकरच सुरू लाँच केले जाणार आहे. त्यासह व्हॉट्सअ‍ॅपकडून वेळोवेळी इमोजी आणि स्टिकर्स अपडेट केले जातात.

आणखी एक फीचर लॉन्च करण्याची व्हॉट्सॲपने तयारी केलीय, ज्याचा वापर करून चॅट दरम्यान यूजर स्टिकर वापरू शकतील. सोप्या भाषेत, जेव्हा यूजर्स चॅटिंग दरम्यान एखादे वाक्य लिहितील, तेव्हा व्हॉट्सॲपकडून त्यानुसार स्टिकरचे सजेशन मिळणार आहे. त्यामुळे शब्दांऐवजी स्टिकर पाठवून चॅटिंग आकर्षक करता येईल.

इतर अनेक फीचर्सवरही व्हॉट्सॲप काम करत आहे, जे यूजर्ससाठी खूप उपयुक्त ठरतील. व्हॉट्सॲप लवकरच एक फीचर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या अकाऊंटमधून लॉग आउट करतील. तसेच एकाच वेळी एकाहून अधिक डिव्हाइसवर व्हॉट्सॲप वापरता येणार आहे.

Please follow and like us: